हाॅकर्सवर एकतरफा कारवाई नको...वंचितचे गटनेते अफसरखान सर्वसाधारण सभेत अक्रामक...
हाॅकर्सवर एकतरफा कारवाई नको, वंचितचे गटनेते अफसरखान सर्वसाधारण सभेत अक्रामक, हाॅकर्स झोन लवकर निश्चित करा... छोट्या व्यावसायिकांना त्रास देवू नका...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी राडा केला. यामध्ये सर्वात पुढे होते वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अफसरखान. त्यांनी महापालिका प्रशासनावर आरोप केला शहरात हाॅकर्स झोन निश्चित नसताना कारवाई सुरू आहे. गरीब हातगाडी व्यावसायिकांवर कार्यवाही केली जात आहे तेही विशेष परिसरात कार्यवाही सुरू आहे. शहागंज, चमन, रोशन गेट, कटकट गेट येथे कार्यवाई करुन हाॅकर्सना त्रास दिला जात आहे. रस्त्यावर हातगाडी लावू दिली जात नाही. वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होतो असे कारण पुढे करून छोट्या व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पण हि कारवाई एकतरफा केली जात आहे विशेष समाजाला टार्गेट केले जात आहे असा आरोप आज अफसरखान यांनी केला. गुलमंडी, सुपारी हनुमान रोड, औरंगपुरा, निराला बाजार येथे वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत नाही का...? तेथे हाॅकर्सवर कार्यवाई कधी करणार असा सवाल त्यांनी महापालिका प्रशासनाला ठणकावून विचारला. एकतरफा कारवाई थांबवावी व मी मागणी केलेल्या भागात हाॅकर्सवर कार्यवाई करावी. तेथे मोटारसायकल चालवणे कठीण आहे अशी माहिती सभागृहात दिली. महापौरांनी कार्यवाईचे आश्वासन दिल्यानंतर अफसरखान शांत झाले. यावेळी ते अक्रामक झाले होते.
What's Your Reaction?