23 सप्टेंबर रोजी मुंबईत धडकणार भव्य रॅली - इम्तियाज जलील
23 सप्टेंबर चलो मुंबई, भव्य रॅली घेऊन धडकणार- इम्तियाज जलील,
सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीला अजून वेळ देतो नाही तर आम्ही शुक्रवार पासून इच्छूकांना अर्ज वाटप करणार - इम्तियाज जलील
छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)
बाबा रामगिरी व नितेश राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व अटक करावी या मागणीसाठी सरकारला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी वेळ दिला होता सरकारने कारवाई केली नाही तर मुंबईत मोठी रैली आणू असा इशारा दिला होता. आज त्यांनी बैठक घेऊन 23 सप्टेंबर रोजी मुंबईत धडकणार असल्याचे जाहीर केले आहे. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्या सोबत येणार आहे. नियोजन कसे असेल यासाठी ते रणनिती बणवत आहे परंतु 23 सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून मुंबईत धडकणार असल्याचे त्यांनी सांगितले. हजारो गाड्यांचा ताफा घेऊन ते मुंबईकडे कुच करणार असल्याचे आज बैठकीत स्पष्ट केले आहे. मुंबईत जाऊन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना संविधानाची प्रत देणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी त्यांनी घेतलेली शपथ देणार. हि रैली शांततेत कायद्याचे पालन करत जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीला सोबत घेण्यासाठी पत्र पाठवणार आहे. अजून वेळ गेलेली नाही. त्यांनी भाजपाचा पराभव करण्यासाठी एमआयएमला सोबत घ्यावे असे आवाहन पत्रकार परिषदेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केले आहे.
विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी बोलावे. त्यांनी आमच्या प्रस्तावावर विचार करावा नाही तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढण्यास तयारी सुरू केली आहे. शुक्रवार पासून आम्ही इच्छूकांना अर्ज वाटप करणार आहे ते अर्ज पक्षाचे अध्यक्ष बॅ.असदोद्दीन ओवेसींना पाठवले जाईल ते निर्णय घेतील कोणाला उमेदवारी द्यायची. त्यांनी मला शहरातून निवडणूक लढण्यास माझ्या नावाची घोषणा केली म्हणून मी त्यांचे आभार मानतो.
महाविकास आघाडीला त्यांनी इशारा दिला आमची ताकत काय आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुमची भुमिका काय हे स्पष्ट करा. मग आमची ताकत आम्ही दाखवून देवू. राष्ट्रवादी हैदराबाद येथून उमेदवार आणणार असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. आम्ही प्रामाणिकपणे प्रस्ताव दिला होता. आम्हाला अद्यापपर्यंत उत्तर मिळाले नाही. जागा किती लढणार याबाबत युतीच्या गणितावर ठरवणार आहे. त्यामुळे आम्ही वाट पाहत आहे नंतर निर्णय घेवू. वंचित बहुजन बाबत आंबेडकरांनी भुमिका घेतलेली आहे ते स्वतंत्र लढणार आणि आम्ही सुद्धा. आमच्याकडे कोणाचा युतीसाठी प्रस्ताव आला तर विचार करु. कारण महायुती व महाविकास आघाडीला लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आम्ही सकारात्मक विचार करु. जरांगे पाटील यांचा सोबत घेण्याचा आम्हाला प्रस्ताव आला नाही. त्यांचा राजकीय पक्ष असला असता तर सोबत जाण्यासाठी विचार केला असता. जातीच्या आधारावर पक्ष त्यांच्यासोबत जावू शकत नाही त्यांची राज्यात मोठी ताकत आहे त्यांच्या एका आवाजावर लाखो लोक रस्त्यावर येतात म्हणून मी त्यांचा आदर करतो.
क्रांतीचौकात मराठा आरक्षणासाठी राजश्री उंबरे यांचे आमरण उपोषण सुरू याबाबत त्यांनी सांगितले मुख्यमंत्री फक्त आश्वासन देत आहे त्यांनी आरक्षणाचा निर्णय घ्यावा. फक्त उल्लू बणवण्याचे काम सुरू आहे. विरोधकांचेही सरकार होते त्यांनीही हेच केले. मुस्लिम समाजाला न्यायालयाने सांगितले तरी आरक्षण दिले नाही. बीफवर सध्या राजकारणात सुरू आहे संजय राऊत यांनी बावनकुळे यांच्या मुलावर आरोप लावला. तर संजय सिरसाट यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. यावर इम्तियाज जलील यांनी सांगितले संजय राऊत आणि संजय सिरसाठ यांनी कित्येकदा लपून छपून बिर्याणी व कबाब खाल्ले असतील आणि दुसरीकडे यावर राजकारण करतात. बीफवरुन निष्पाप वृध्दाला रेल्वेत मारहाण केली जाते भावनेच्या भरात सामान्य लोक असले कृत्य करतात. सर्व राजकीय नेते बीफ खातात असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
What's Your Reaction?