350 एकरवर जिल्ह्याचा तबलिगी इज्तेमा 4 व 5 जानेवारीला

 0
350 एकरवर जिल्ह्याचा तबलिगी इज्तेमा 4 व 5 जानेवारीला

350 एकरवर जिल्ह्याचा तबलिगी इज्तेमा 4 व 5 जानेवारीला

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) नवीन वर्षाच्या सुरुवातीला 4 व 5 जानेवारीला जिल्ह्याचा तबलिगी इज्तेमा कसाबखेडा येथे आयोजित करण्यात आला आहे. इज्तेमा यशस्वी करण्यासाठी मागिल तीन ते चार महीन्यांपासून तयारी सुरू आहे. मुस्लिम बांधव येथे दोन दिवसीय इज्तेमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून इबादत व देशाची प्रगती भाईचारा व अमन कायम राहावे यासाठी अल्लाहकडे दुवा करणार आहे. हजारो युवक येथे खिदमत करण्यासाठी झटत आहेत. 350 एकर खुल्या जागेवर हा इज्तेमा बंधूभाव व एकतेचा संदेश देण्यासाठी होत आहे. जिल्ह्यातील 9 तालुक्यातील मुस्लिम बांधव शांततेत इज्तेमागाहकडे येणार आहे यामध्ये शिस्तीचे दर्शन नेहमीप्रमाणे दिसून येत आहे. 

इज्तेमाचे नियोजन कशापध्दतीने करण्यात आले याचा आम्ही आढावा घेतला तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 350 एकरवर हे नियोजन करण्यात आले. यामध्ये मोटारसायकल व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था तीन ते चार ठिकाणी 50 ते 60 एकरवर करण्यात आली आहे. 50 हजार लोक बसतील यासाठी 800×1000 फुटाचा भव्य पंडाल उभारण्यात आला आहे. मुस्लिम धर्मगुरु जे बयान करतील तो आवाज जाण्यासाठी साऊंडची व्यवस्था करण्यात आली आहे. 2500 वजूखाने, 275 ताहरतखाने, बैतूलखला 550, पाण्यासाठी एक 35 लाख लिटर तर दुसरा 25 लाख लिटर शेततळे उभारले आहे. 532 दुकाने उभारण्यात आली आहे. 13 ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाच ठिकाणी दवाखाने, डॉक्टर, औषध व्यवस्था व पाच ते दहा रुग्णवाहिका सेवा असणार आहे. अग्निशमन दलाच्या बंब आग लागली तर यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रस्त्यावर येणाऱ्या वाहतूकीला सुरळीत

करण्यासाठी हजारो स्वयंसेवक खिदमतसाठी असणार आहे. येणाऱ्या भाविकांसाठी रस्त्यावर पाणी, भोजनदान करण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी बाद नमाज असर शेकडो निकाह येथे लागणार आहे. बाद मगरीब दुवा व त्यानंतर शेकडो जमात निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow