5 लाख कार्यालयाचे भाडे आणि स्वतःच्या जागेचे चारशे ते पाचशे रुपये भाडे, नवीन कर्मचा-यांना बसून पगार, वक्फ बोर्डाचा प्रताप...!

 0
5 लाख कार्यालयाचे भाडे आणि स्वतःच्या जागेचे चारशे ते पाचशे रुपये भाडे, नवीन कर्मचा-यांना बसून पगार, वक्फ बोर्डाचा प्रताप...!

5 लाख कार्यालयाचे भाडे आणि स्वतःच्या जागेचे तीन चारशे रुपये भाडे, नवीन कर्यचा-यांना बसून पगार, वक्फ बोर्डाचा प्रताप...!

हज हाऊस ते वक्फ बोर्ड कार्यालयापर्यंत काढला मोर्चा.... पूर्ण वेळ सिईओ नसल्याने कामकाज ठप्प, नवीन वक्फ अधिकारी, कर्मचाऱ्यांना जवाबदारी नाही बसून लाखो वेतनाचे वाटप...!

औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) वक्फ बोर्डाच्या हजारो एकर जमीन राज्यात असताना मुंबईत विभागीय कार्यालयासाठी दर महिन्याला पाच लाख रुपये भाड्यावर खर्च केला जात आहे. आणि वक्फ बोर्डाच्या जागा भाडेतत्त्वावर दिले असताना फक्त फक्त चारशे ते पाचशे भाडे आकारले जात असल्याने वक्फ बोर्डाचे कोट्यावधीचे नुकसान होत आहे. नवीन भाडे आकारणी करुन उत्पन्न वाढवले पाहिजे. नवीन भरती प्रक्रिया करून 30 वक्फ अधिकारी व क्लार्क व विविध पदे भरण्यात आली. परंतु त्यांना आतापर्यंत जवाबदारी दिली नसल्याने दर महीन्याला 15 लाख वेतनासाठी खर्च केला जात आहे. पूर्णवेळ सिईओ नसल्याने नवीन नोंदणी, स्किमचे कामकाज ठप्प झाले आहे. महाराष्ट्रातील लोक कार्यालयाच्या खेट्या मारत आहे. अशा विविध मागणीसाठी शेख मोहम्मद खुर्रम अब्दुल रशीद यांनी हज हाऊस ते वक्फ बोर्ड कार्यालय पवनचक्की पर्यंत मोर्चा काढला व मागणीचे निवेदन दिले.

निवेदनात मागणी केली आहे कायमस्वरूपी सिईओ ची नियुक्ती करावी, मुंबईचे भाड्याचे कार्यालय बंद करून स्वतःच्या जागेवर सुरू करावे. वक्फ बोर्डाची कार्यकारिणी बरखास्त करावी. वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमण काढावे. भाडेकरुंची भाडेवाढ करावी. रखडलेले कामे लवकर मार्गी लावावे. टाऊनहाॅलचे वक्फ मंडळाच्या अनाधिकृत पेट्रोल पंपाचे काम चालू आहे ते बंद करावे. पलंब बावली जालना येथील जागेवर बेकायदेशीर होत असलेल्या भाग्यनगर ते इंदिरानगर रस्त्याचे काम त्वरित थांबवावे. कामात अनियमितता होत असल्याने पायबंद घालावे अशी मागणी सिईओ यांना दिलेल्या निवेदनात केली आ

हे. यावेळी अब्दुल रज्जाक खान, अयाज शेख, शेख अब्दुल कंदील, मोहम्मद आरीफोद्दीन, निजाम खान आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow