I.S.L.A.M.पक्षाची शहरात इंट्री, कोअर कमेटीची घोषणा, एमआयएमवर टिका, औरंगजेब कबरीवर भेट...
I.S.L.A.M. पक्षाची शहरात इंट्री, कोअर कमेटीची घोषणा, एमआयएमवर टिका... औरंगजेबाच्या कबरीवर भेट...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - मालेगाव शहरात 35 नगरसेवक निवडून आले. मुस्लिम महीला महापौर बनवण्याची किमया राष्ट्रीय अध्यक्ष शेख आसिफ यांनी महाराष्ट्रात करुन दाखवली. I.S.L.A.M (Indian Seculal Largest Assembly Of Maharashtra ) पक्षाची शहरात पवित्र रमजान महिन्याच्या दावत-ए-इफ्तार पार्टीच्या निमित्ताने शहरात इंट्री झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख आसिफ यांनी खुलताबाद येथील औरंगजेब रह. यांच्या कबरीवर भेट दिली. याबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्टीकरण दिले. आमचा पक्ष सेक्युलर आहे. मालेगावात तीन हिंदू नगरसेवक निवडून आले. मालेगाव येथून येताना नमाजाची वेळ झाली असताना औरंगजेब कबरीजवळ मस्जिद मध्ये नमाज अदा केली. खुलताबाद येथे आणखी दर्गा आहे तेथेही भेट दिली. मुस्लिम धर्माच्या शिकवणीनुसार दर्गावर जावून दरुद शरीफचे वाचन केले यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. आमच्या पक्षाचा हेतू आहे जनतेचे प्रश्न सुटावे. सर्व जाती धर्मातील लोकांसाठी आमचा पक्ष करणार आहे. इस्लाम हा शाॅर्ट मध्ये पक्षाचा नाव असल्याने गैरसमज पसरवले जात आहे जनतेने यावर विश्वास ठेवू नये. मालेगावात पहिला ठराव शहरात भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यासाठी निर्णय घेतला आहे. एमआयएम मुस्लिम व भाजपा हिंदू धर्मासाठी काम करत आहेत ते आम्ही करणार नाही. पक्षाचा विस्तार ईदनंतर मुंबईत बैठक घेऊन सुरू करणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कार्यकारिणी बनत नाही तोपर्यंत कोअर कमेटीची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. कोअर कमिटीच्या माध्यमातून जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवले जातील. एमआयएम पक्षाला शहरातील जनतेने एकदा खासदार, आमदार व नगरसेवक निवडून दिले तरीही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. सत्ताधारी पक्ष भाजपा व शिवसेना यांनीही पाणी प्रश्न सोडवला नाही. पाण्याच्या योजनेचा अभ्यास करणार आहे. 2700 कोटींची पाण्याची योजनेचे शहरात काम सुरू आहे. भ्रष्टाचारामुळे योजना पुर्णत्वास गेली नाही. ईदनंतर पाणी प्रश्नावर मोठे आंदोलन उभे करणार आहे. कोअर कमिटीच्या माध्यमातून एस. आय. आर. (मतदार यादी पून:निरीक्षण) कार्यक्रमात मतदारांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयएम तेलंगणा राज्यातून छत्रपती संभाजीनगर व राज्यात विस्तार करत आहे मग आम्हालाही राजकीय पक्ष म्हणून पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. भाजपा व एमआयएमशी आमचा या शहरात मुकाबला असणार आहे. भविष्यात आमचा पक्ष आगामी निवडणुकीत खाते उघडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोअर कमिटीत कोण आहेत...
रफत यारखान, कलिम कुरेशी, गाजी सदाउद्दीन उर्फ पप्पू कलानी, सलिम पटेल, आरेफ हुसेनी, जफर बिल्डर, अबुल आला हाश्मी, जमील खा
न.
What's Your Reaction?