अंबड, पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
जालना, दि.24(डि-24 न्यूज) एका पोलिस उपनिरीक्षकाला 30 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
योगेश हरि चव्हाण, वय 39, व्यवसाय नोकरी, पद पोलिस उपनिरीक्षक, पोलिस स्टेशन अंबड, जिल्हा जालना.
तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीची शेती गट क्रमांक 718 क्षेत्र 5 एकर 29 गुंठेचा व्यवहार संतोष हरणे यांचेशी केला त्यात वाद विवाद होऊन संतोष हरणे यांनी पोस्ट अंबड येथे तक्रारदार यांचे विरोधात अर्ज दिला. त्या अर्जाचे चौकशी मध्ये तक्रारदार यांच्या बाजूने मदत करुन देण्यासाठी ओलेसे यांनी प्रथम तक्रारदार यांचे मित्रामार्फत दहा हजार लाच स्विकारली व अजून 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. दि. 23 रोजी पंच साक्षीदार समक्ष प्रत्यक्ष तक्रारदार यांचेशी लाच बाबत बोलनी करुन तडजोडी अंती 30 हजार रुपये लाच मागितली. स्वतः लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडून पंच साक्षीदार यांचे समक्ष स्विकारली.
आलोसे यास ताब्यात घेतले असून अंबड पोलिस स्टेशन, जिल्हा जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरील कार्यवाही सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक राहुल फुला यांनी पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, पोलिस उप अधिक्षक राजीव तळेकर, पोहेका शिरीष वाघ, पोना राजेंद्र सिनकर, पोशि चांगदेव बागूल यांनी हि कार्यवाही केली आहे.
What's Your Reaction?






