अजितदादा पंचतत्वात विलिन, शहर झाले सुन्न, शहरात शुकशुकाट...
अजितदादा पंचतत्वात विलिन, शहर झाले सुन्न...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या सोबत त्यांचे सुरक्षा रक्षक, पायलट, को पायलटसह चार जणांचे दुर्दैवी मृत्यू झाले. आज सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपुत्र जय पवार यांनी त्यांना मुखाग्नी दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, युगेंद्र पवार, इम्तियाज जलील आणि सर्व मंत्री, महाराष्ट्रातून व देशातील दिग्गज नेते, लाखो कार्यकर्ते व चाहत्यांनी हजेरी लावत डोळ्यात अश्रू होते. राज्यात तीन दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अजित दादा पवार अमर रहे, अजित दादा परत या, असा नेता होणे नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शासकीय इतमामात यावेळी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरवर अजित दादा पवार यांचे अधिक प्रेम व विकासाची तळमळ होती. राज्यात त्यांच्या निधनाने दु:खाचे सावट आहे. आज शहर सुन्न झाले होते सर्वत्र शुकशुकाट होता. शहरात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी मोठमोठे होर्डिंग्ज लागले आहे. दादा माणूस गेला...असा नेता पुन्हा होने नाही. नि:शब्द आपले दादा गेले... दादांना भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर लिहला आहे.
राष्ट्रवादी विलिनीकरणाची मागणी, नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याची मागणी. अजित दादा पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण होण्याची दादांची होती ती पूर्ण होणार का आता हि चर्चा सुरू झाली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री कोण होणार या विषयावर मंथन होईल. सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर विलिनीकरण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. विमान अपघाताबाबत नागरी उड्डायन मंत्रालयाने घटनेचा तपशील प्रसिध्दीपत्रक जाहीर केले आहे.
What's Your Reaction?