अनुदानित खतांची विक्री ई-पास प्रणालीद्वारे करणे बंधनकारक, 26 कृषी केंद्रावर साठ्यात आढळली तफावत

 0
अनुदानित खतांची विक्री ई-पास प्रणालीद्वारे करणे बंधनकारक, 26 कृषी केंद्रावर साठ्यात आढळली तफावत

अनुदानित खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक;

26 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; विक्री व साठ्यात आढळली तफावत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.7 (डि-24 न्यूज)- कृषी सेवा केंद्रचालकांनी अनुदानित खतांची शेतकऱ्यांना विक्री करतांना ती डिजीटल विक्री यंत्र अर्थात ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील २६ कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली असता त्यांनी ऑफलाईन पद्धतीने खतांची विक्री केली असल्याने झालेली विक्री व साठा यात तफावत आढळून आल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर प्रकाश पाटील यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांनी देखील अनुदानित खते खरेदी करताना ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.  

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, अनुदानित खत युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, डीएपी, 10-26-26 यांची विक्री ई-पॉस प्रणाली मार्फतच करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. किरकोळ खत विक्रेत्यांना ई-पॉस प्रणालीवर अनुदानित खत प्राप्त झाल्यानंतरच खतांची विक्री शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.

कृषी विभागाने केलेल्या तपासणीत असे निर्देशनास आले की, कृषी सेवा केंद्र संचालक अनुदानित खतांचा साठा ई-पॉस प्रणालीवर येण्याच्या अगोदरच शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने विक्री करत आहेत व त्यासाठी ई-पॉस मशीन बंद आहे अशी सबब देतात. अनुदानित खतांची विक्री ई-पॉस शिवाय करणे ही गंभीर बाब आहे. ऑफलाइन पद्धतीने विक्री केल्यामुळे कृषी सेवा केंद्रातील ई-पॉस प्रणाली व प्रत्यक्ष खत साठ्यात तफावत आढळून येत आहे. प्रधान सचिव कृषी यांनी बाबत अनुदानित खतांची विक्री ही ऑनलाईन पद्धतीने ई-पॉस प्रणालीद्वारेच करावी असे सक्त निर्देश देण्यात आले आहे.

 

कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कृषी सेवा केंद्राची तपासणी मोहिम राबविण्यात आली ई-पॉस प्रणालीवरील खताचा साठा व कृषी सेवा केंद्रातील खतांचा प्रत्यक्ष साठा पडताळणी करण्यात आली. त्याअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 26 कृषी सेवा केंद्रांवर कार्यवाही करण्यात आली.  

कार्यवाही करण्यात आलेले कृषी सेवा केंद्र...

उत्कर्ष कृषी सेवा केंद्र दहेगाव बंगला, ता.गंगापूर, मेहराज एजन्सी दहेगाव बंगाल ता.गंगापूर, किसान एजन्सी दहेगाव बंगला ता.गंगापूर, हरी ओम कृषी सेवा केंद्र, दहेगाव बंगला ता.गंगापूर, सदगुरु ॲग्रो सर्व्हिेस दहेगाव बंगला ता.गंगापूर, तिरुपती कृषी सेवा केंद्र, बाबरा ता.फुलंब्री, स्वराज कृषी सेवा केंद्र, ता.फुलंब्री, विश्वास ॲग्रो सर्व्हिेस बालानगर ता. पैठण, न्यू जय भोले कृषी सेवा केंद्र, जोडवाडी ता. छत्रपती संभाजीनगर, गौरी कृपा कृषी सेवा केंद्र करमाड ता. छत्रपती संभाजीनगर, मृदा संजीवनी शेती साहित्य गांधेली ता. छत्रपती संभाजीनगर, नागेश्वर कृषी सेवा केंद्र, बाबरा ता.फुलंब्री, माऊली कृषी सेवा केंद्र देवगाव रंगारी ता. कन्नड, विशाल कृषी सेवा केंद्र, वाकोद ता.फुलंब्री, संतोष कृषी सेवा केंद्र धोंदलगाव ता. वैजापूर, श्री. सदगुरु कृपा कृषी सेवा केंद्र बालानगर ता. पैठण, मराठवाडा कृषी सेवा केंद्र जटवाडा ता. छत्रपती संभाजीनगर, हरी ओम ट्रेडर्स जटवाडा ओव्हर ता. छत्रपती संभाजीनगर, अमृतीा ॲग्रो एजन्सी विहामांडवा ता. पैठण, आर. के. ॲग्रो शरणापूर ता. छत्रपती संभाजीनगर, नाथ कृषी उद्योग गारज ता.वैजापूर, ओम साई ट्रेडर्स खंडाळा ता. वैजापूर, आदर्श कृषी सेवा केंद्र, जाधववाडी ता. छत्रपती संभाजीनगर, गणेश कृषी सेवा केंद्र ता. कन्नड.

ई-पॉस प्रणालीवर वरुन विक्री न केल्याने कृषी सेवा केंद्राच्या ई-पॉस प्रणालीवर जास्त खत साठा तसेच प्रत्यक्ष कृषी केंद्रावर कमी खत साठा अशी परिस्थिती निर्माण होते व त्याचा परिणाम जिल्ह्याच्या खत पुरवठ्याच्या मागणीवर होतो. केंद्र शासनामार्फत करण्यात येणारा खत पुरवठा ई-पॉस प्रणालीवर उपलब्ध असलेल्या खत साठ्याच्या अनुषंगाने करण्यात येतो.

कृषी सेवा केंद्रांनी ई-पॉस प्रणालीवर खत उपलब्ध झाल्यानंतरच प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खतांची विक्री करावी. कृषी सेवा केंद्र यांनी ऑफलाईन पद्धतीने खताची विक्री करु नये, तसे आढळल्यास खत नियंत्रण कायदा 1985 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल,असा इशारा जिल्हा परिषदेच कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow