अफवा पसरवणाऱ्या पोस्टवर पोलिसांची कडक नजर, शहरात शांतता कायम राहण्यासाठी पोलिस आयुक्तांचे आवाहन
 
                                अफवा पसरवणाऱ्या पोस्टवर पोलिसांची कडक नजर, शहरात शांतता कायम राहण्यासाठी पोलिस आयुक्तांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) नागपूरच्या घटनेनंतर शहर पोलिस अलर्ट मोडवर आले आहे. सोशल मिडियावर अफवा पसरवणाऱ्या पोस्टवर पोलिसांची कडक नजर आहे. वातावरण खराब करणारे व्हिडिओ, पोस्ट किंवा डिपी ठेवणा-यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सध्या पवित्र रमजान महीना सुरू आहे. यानंतर राम नवमी व विविध सण उत्सव शांततेत व्हावे यासाठी शहर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात विविध देशांतील व स्थानिक उद्योजक करुन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. शहरात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने शांततेचे वातावरण नेहमीसारखे राहावे. विविध जाती धर्माचे सण उत्सव शांततेत व्हावे यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. अफवांवर नागरीकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी केले आहे. सिटीचौक ते किराडपुरा राममंदिर पर्यंत संध्याकाळी शहर पोलिसांनी रुट
 
मार्च काढून नागरीकांना आवाहन केले.
यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे व विविध पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            