आदर्श घोटाळ्यातील सबळ पुरावे पोलिसांनी केले हस्तगत, मालमत्ता जप्त, लवकरच मिळणार ठेवीदारांचे पैसे

 0
आदर्श घोटाळ्यातील सबळ पुरावे पोलिसांनी केले हस्तगत, मालमत्ता जप्त, लवकरच मिळणार ठेवीदारांचे पैसे

आदर्श ठेवीदारांचे पैसे परत मिळणार; जप्त मालमत्ता विक्रीचे प्रस्ताव लवकरच शासनाकडे होणार सादर

आतापर्यंत कोट्यावधीची मालमत्ता जप्त; महाघोटाळेबाजा विरुध्द पोलीसांनी सबळ पुरावे केले हस्तगत - पोलीस आयुक्तांनी खासदार जलील यांना दिली माहिती

औरंगाबाद,दि.14(डि-24 न्यूज) आदर्श नागरी पतसंस्थेतील घोटाळेबाजांवर कारवाई करुन ठेवीदारांच्या ठेवी देण्यात याव्यात यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांसोबत विविध ठिकाणी तीव्र आंदोलन करुन मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीवर भव्य मोर्चा सुध्दा काढला होता. तसेच लवकरात लवकर गोरगरीब ठेवीदारांची रक्कम परत मिळावी याकरिता पोलीस व इतर विभागांकडून होत असलेल्या कारवाईवर खासदार इम्तियाज जलील बारकाईने लक्ष देत असून विविध स्तरावर सतत बैठका घेवुन पाठपूरावा करत आहे.

          औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी आदर्श घोटाळा प्रकरणी आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीची मुद्देनिहाय सविस्तर माहिती खासदार इम्तियाज जलील यांना पत्राव्दारे कळविली.

          पोलीस आयुक्तांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात नमुद केले की, 1. सदर गुन्हयात आता पावेतो आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक व इतर आरोपी एकुण 15 आरोपीतांना अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन दोन्ही गुन्हयात तपास करण्यात आला आहे. यात सहनिबंधक कार्यालयाचे सतीष खरे यांचा देखील समावेश आहे.

          2. आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिवज्योती कॉलनी एन-6 सिडको, औरंगाबाद या संस्थेचे जाळे औरंगाबाद जिल्हयात पसरलेले असुन एकुण 44 शाखा आहेत.

          3 गुन्हयात गैरव्यवहार / गैरप्रकार झालेल्या कर्ज प्रकरणाच्या मुळ फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पतसंस्थेची तीन वाहने जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तीन आरोपीतांचे घरझडत्या घेवुन तसे पंचनामे करण्यात आले आहे. मालमत्तेची माहिती मिळण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला असुन 62 स्थावर मालमत्तांची माहिती घेण्यात आली असुन त्याची रेडीरेकनर दरा नुसार किंमत 90 कोटी रुपये आहे. उर्वरीत मालमत्तेची माहीती प्राप्त करण्यात येत आहे.

          4 सदर गुन्हयात ठेवीदारांचे / खातेदारांची रक्कम परत मिळण्याकरीता एमपीआयडी कायदा 1999 कलम 3 व 4 तसेच सहकलम 21 व 23 अनियंत्रीत जमा योजना प्रतिबंध कायदा 2019 कायदयाप्रमाणे मालमत्ता संरक्षित करण्यासाठी मालमत्तेची माहिती मिळविण्याचे काम चालु आहे. त्यानंतर रितसर शासनाकडे प्रस्ताव सादर करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

          यातील नमूद अटक आरोपीताविरुध्द सबळ पुरावे हस्तगत झाल्याने त्यांचे विरुध्द मुदतीत मा. न्यायालयात दोषारोपपत्र क्रमांक 386/2023, 391/2023 दिनांक 11/9/2023 व दिनांक 23/9/2023 अन्वये दाखल करण्यात आले असून सदरचे दोन्ही गुन्ह्याचा बारकाईने तपास करण्यात येत आहे व त्यावर आम्ही जातीने लक्ष ठेवून असल्याचे दिलेल्या पत्रात पोलीस आयुक्तांनी नमूद केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow