आमदार सतीश चव्हाण यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तुतारीसाठी प्रयत्नशील...?
आमदार सतीश चव्हाण यांची राष्ट्रवादीतून निलंबनाची कारवाई
मुंबई,दि.18(डि-24 न्यूज) मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील आमदार सतीश चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करुन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
जाणीवपूर्वक पक्षविरोधी भुमिका घेतल्यामुळे व पक्षशिस्त मोडल्याने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याची तटकरे यांनी सांगितले आहे.
15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने पक्षविरोधी भुमिका घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भुमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. चव्हाण यांनी जाणिवपूर्वक शिस्तभंग केल्याने निलंबनाची कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सतीश चव्हाण हे शरद पवार यांच्या संपर्कात आहे. गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत. तुतारी हातात घेऊन निवडणुकीत उभे राहण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवार त्यांना संधी देतील का हे आता बघावे लागेल.
What's Your Reaction?