इस्लाम पार्टीचे नेते रफत यारखान यांच्यावर जीवघेणा हल्ला, घाटीत उपचारासाठी दाखल, प्रकृती चांगली...

 0
इस्लाम पार्टीचे नेते रफत यारखान यांच्यावर जीवघेणा हल्ला, घाटीत उपचारासाठी दाखल, प्रकृती चांगली...

इस्लाम पार्टी के नेता रफत यारखान यांच्यावर जीवघेणा हल्ला...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- मिल काॅर्नर येथील रहिवासी इस्लाम पार्टीचे नेते रफत यारखान यांच्यावर अज्ञातांनी दुपारच्या सुमारास जुना बाजार येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला. 

या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. रक्त बंबाळ अवस्थेत त्यांना ऑटो रिक्षाने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले काही अज्ञातांनी रफत यारखान यांच्यावर हल्ला केला मारहाण झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रफत यारखान यांच्यावर उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी सांगितले त्यांची प्रकृती चांगली आहे. मिल काॅर्नर येथे बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेतील एका आरोपीला अटक केली आहे. आणखी आरोपिंना लवकरच अटक करण्यात येईल. अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये. शहरात शांतता आहे. असे आवाहन त्यांनी केले आहे.

सविस्तर बातमी...

माजी नगरसेवकावर दुसऱ्यांदा हल्ला; लोखंडी रॉड-काठ्यांनी मारहाण, राजकीय वाद पुन्हा चिघळला...

महानगरपालिका निवडणुकीनंतर माजी व विद्यमान नगरसेवकांमधील वाद पुन्हा एकदा हिंसक वळणावर गेला आहे. गुरुवारी दुपारी जुना बाजार परिसरात चार ते पाच जणांनी माजी नगरसेवक रफत यार खान यांचा पाठलाग करून लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रफत यार खान यांनी नुकतेच मालेगाव येथील इस्लाम पक्षात प्रवेश केला आहे. महानगरपालिका निवडणुकीपासून त्यांचा काही माजी नगरसेवकांशी वाद सुरू होता. यापूर्वीही दोन्ही गटांत दोन वेळा किरकोळ झटापट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना पोलिस सुरक्षा देण्यात आली होती.

गुरुवारी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास रफत यार खान हे जुना बाजार परिसरात गेले असता, सिटी चौक पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर त्यांची दुचाकी घसरली. त्याच वेळी पाठलाग करणाऱ्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड व काठ्यांनी बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याला सुमारे दहा टाके घातल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर राजकीय तणाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त सागर देशमुख तसेच पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घाटी रुग्णालयात भेट देत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला.

पूर्वीही झाला होता हल्ला...

20 मार्च रोजी सिल्लेखाना चौक परिसरात रफत खान यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला होता. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी झालेला हल्ला हा त्याच जुन्या वादातून नियोजित पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप रफत खान यांनी केला आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow