उद्यापासून आमखास मैदानावर विद्रोही मराठी साहित्य संमेलन, मराठी नाटकाने सुरुवात...!

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला उद्या पासून सुरुवात
आमखास मैदानावर अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नाटकचे सादरीकरण
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) 19 वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला आमखास मैदानात मलिकअंबर नगरीत उद्या फेब्रुवारी 2025 पासून सुरूवात होत असून पहिल्या दिवशी जागतिक कीर्तीचे प्रबोधनात्मक नाटक शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नाटक याचे सायंकाळी सादरीकरण होणार आहे. या नाटकाचा रसिकांनी अस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहरात होणाऱ्या 19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात तीन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार असून संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. आमखास मैदानावर उभारलेल्या मलिकअंबर साहित्यनगरीत 2 भव्य सभामंडप असून 3 दालनांमध्ये बालमंच, युवा मंच यासह एकूण 4 विचार मंचावर विद्रोहीचे विविध कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाची सुरुवात जागतिक कीर्तीचे प्रबोधनात्मक नाटक शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला याच्या सादरीकरणापासून होणार आहे. राजकुमार तांगडे लिखीत, नंदू माधव यांचे दिग्दर्शन , रॉकस्टार संभाजी भगत यांचे गित संगित आणि भगवान मेदनकर यांची निर्मिती असलेले नाटक रात्री 7 वाजता होणार आहे. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता औरंगापुरा येथील महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते आमखास मैदानापर्यंत सांस्कृतिक विचारधारा यात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष मराठीतील लोकसाहित्य, संस्कृती व प्राच्यविद्या अभ्यासक, इतिहास संशोधक,भाषा तज्ञ, विचारवंत डॉ.अशोक राणा यांची उपस्थिती राहणार आहे. तर ख्यातनाम आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक, समीक्षक, अनुवादक, विचारवंत कंवल भारती (दिल्ली) यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रख्यात ग्रामीण साहित्यिक व पूर्वाध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे, कवयित्री प्रा प्रतिभा अहिरे, प्रा.प्रल्हाद लुलेकर, प्रख्यात उर्दू साहित्यिक नुरूल हसनैन , सूर्यकांताताई गाडे यांची उपस्थिती राहणार आहे.
विद्रोही साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी, राज्यसंघटक किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष इंजि. सतीश चकोर व मुख्यनिमंत्रक ॲड.धनंजय बोर्डे, कार्यवाह चित्रकार राजानंद सुरडकर, कार्याध्यक्ष खलील अहमद, खजीनदार ॲड.के.ई.हरिदास, अनिलकुमार बस्ते, भाऊसाहेब जाधव, समन्वयक प्रा.भारत सिरसाठ, ॲड.वैशाली डोळस, अनंत भवरे, डॉ.धोंडोपंत मानवतकर, वजीर शेख, जितेंद्र भवरे, मधुकर खिल्लारे, सविताताई अभ्यंकर, डॉ. विनय हतोले, रामदास अभ्यंकर, भीमराव गाडेकर, वैभव सोनवणे, सुधाकर निसर्ग, कबीर बोर्डे, रतनकुमार साळवे यांनी केेले आहे.
What's Your Reaction?






