उद्या आदीत्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात हल्लाबोल मोर्चा...

 0
उद्या आदीत्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात हल्लाबोल मोर्चा...

शिवसेना नेते - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल महामोर्चा...

शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची माहिती...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) : शिवसेना नेते - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या 16 मे रोजी भव्य हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगर शाखेच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजक अंबादास दानवे यांनी सांगितले. 

सायंकाळी 4.30 वाजता क्रांती चौक येथील अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर या मोर्चास सुरुवात होणार आहे. पैठण गेट येथील लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पुढे गुलमंडीपर्यंत हा हल्लाबोल महामोर्चा जाणार आहे. गुलमंडी येथील संभाजीनगरचे प्रथम नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्यासमोर जाहीर सभा होणार आहे. सभा संपन्न झाल्यांतर मनपा आयुक्त यांच्याशी शहराच्या पाणी प्रश्नावर चर्चा करणार आहे. 

या हल्लाबोल महामोर्चात मोठ्या संख्येने संभाजीनगर वासियांनी आणि शिवसेना पदाधिकारी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना, आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक, शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे..

याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरीभाऊ हिवाळे पाटील, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, उपशहरप्रमुख संजय हरणे, मिथुन व्यास, राजेंद्र दानवे, दिनेशराजे भोसले, युवासेना सहसचिव ॲड धर्मराज दानवे, जिल्हाधिकारी हनुमान शिंदे व संदीप लिंगायत उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow