उध्दव ठाकरे अंतरवाली सराटी रवाना, आंदोलकांची भेट घेणार

 0
उध्दव ठाकरे अंतरवाली सराटी रवाना, आंदोलकांची भेट घेणार

उध्दव ठाकरे अंतरवाली सराटी रवाना... आंदोलकाची घेणार भेट...अंबडलाही जाणार...

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अंतरवाली सराटी मोटारीने रवाना झाले आहे. रात्री 7.30 वाजता औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे रवाना झाले आहे. गाड्यांचा ताफा पोलिसांच्या बंदोबस्तात तालुका अंबड , अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेले आंदोलकांवर काल लाठीहल्ला झाला. आंदोलन करणारे व गावातील नागरिक यांची भेट घेऊन ठाकरे संवाद साधणार आहेत. त्यानंतर अंबड शासकीय रुग्णालयात जखमी झालेले आंदोलकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल. तेथून मुंबईला प्रयाण करतील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow