उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद, केंद्र व राज्य सरकारवर टीका...

 0
उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद, केंद्र व राज्य सरकारवर टीका...

उध्दव ठाकरे यांचा मराठवाड्यात दौरा, शेतकऱ्यांशी साधला संवाद, केंद्र व राज्य सरकारवर केली टिका...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने दिपावली पूर्वी मदतीच्या पॅकेजची घोषणा केली होती ती मदत शेतकऱ्यांना मिळाली का यासाठी आजपासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद दौरा सुरू केला आहे. त्यांनी गावा गावात जाऊन व बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व अडी अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथे पक्षप्रमुख उद्भवजी ठाकरे यांनी आज शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे व माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरेंनी यावेळी सांगितले शेतकरी भोळाभबाडा आहे.

इतिहासात कधी नव्हे एवढी आपत्ती मराठवाडय़ात आली.

हेक्टरी 50 हजार मिळालाय पाहिजे अशी आमची मागणी आहे. राज्य सरकार फक्त अभ्यास करत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना मी कसलीही मागणी नसताना कर्जमुक्ती केली होती.

राज्य सरकारकडे कर्जमुक्ती साठी संपूर्ण यंत्रणा आहे.

परदेशी समिति स्वदेशी शेतकर्‍यांची वाट लावणार आहे. जाहीर केलेले पॅकेज ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. नुकसान भरपाई अजून कोणालाच मिळाली नाही. 

पीक विमा 2 किंवा 3 रुपये देऊन शेतकर्‍यांची थट्टा सुरू आहे. एका शेतकर्‍याला 89 रुपये मिळाले याची खंत वाटते.

आता कर्जमुक्ती केली तर बॅंकांना फायदा होईल असे म्हणतात तर जून मध्ये बॅंकांना फायदा होणार नाही याची माहिती सरकारने द्यावी.

न्याय मिळेपर्यंत शेतकर्‍यांच्या पाठीशी राहणार. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत लढत राहणार असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले दिवाळी अगोदर नुकसान भरपाई देऊ असे म्हणाले मदतीच्या नावाने आळस करतात. जून मुदत मान्य नाही लगेच कर्जमुक्ती करा.

शेतकरी हताश झाला आहे. आता त्याला मदत केली नाही तर तो शेतकरी संकटात जाईल.

खोटे बोलणारे हे सरकार असून याच्या विरोधात उभे राहणे आहे. शेतकरी म्हणुन एकत्र आलो तरच न्याय मिळणार आहे. शेतकरी जमिनीतून कोंब फोडू शकतो तर राज्य सरकारला नक्कीच फोडणार आहे. शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री बिहार मध्ये प्रचार करत आहे.

कर्जमुक्ती झालीच पाहिजे...50 हजार हेक्टरी मिळेपर्यंत सोबत असणार आहे.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा बीड जिल्ह्यातील पाली येथे दौरा...

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा मुहूर्त जून मध्ये काढला आहे.

लाडकी बहीण निवडणूक पर्यंत घरातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता आता अनेक अटी लावून लाभार्थी कमी केले जात आहे. 

शेतकर्‍यांना हमी भाव मिळत आहे का याचे उत्तर मोदी यांनी द्यावे. कर्जमाफी नंतर शेतकरी मतदान करतील अशी भूमिका ठेवावी. कर्जमुक्ती केली तरच येणार्‍या निवडणुकीत मतदान करू असे ठाम पणे सांगा. असे आवाहन बीड जिल्ह्यातील पाली येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले.

संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. जगातली सर्वात मोठे नुकसान भरपाई कुठे आहे असा प्रश्न विचाराला. 

देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू केलेली कर्जमुक्ती शेतकर्‍यांना मिळालीच नाही. 

शेतकरी फुकट नव्हे तर हक्काची कर्जमुक्ती मागत आहे. 

सरकारच मत चोरी करून आले आहे तर त्यांना जाब विचारला गेलाच पाहिजे.

विरोधी पक्षनेते नसताना अंबादास दानवे शेतकर्‍यांसाठी 

फिरत आहे.  

मी तुमच्यात असताना राज्याचे मुख्यमंत्री बिहार मध्ये आहे. 

बिहार वर अधीक प्रेम असताना महाराष्ट्र सावत्रपणा आहे का..? असा प्रश्न उपस्थित केला.

शेतकर्‍यां सोबत शिवसेना उभी आहे. शेतकरी म्हणुन एकत्र आलो तर कोणतेही सरकार झुकू शकते तर राज्य सरकार का झुकणार नाही.

शेतकरी बांधव यांनी धीर सोडू नये. राज्य सरकारने कर्जमुक्त केले नाही तर रस्त्यावर उतरून शेतकर्‍यांचा आक्रोश मांडू असे उद्धव ठाकरे म्हणाले.

धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातील पाथ्रुड, भुम दौरा...

शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र..

उद्धव ठाकरे थेट जनतेत न्याय मिळवून देण्यासाठी आलो आहे. राजकारण करण्यासाठी नव्हे.

शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे. इतिहासातली सर्वात मोठी भरपाई ही मोठी थाप आहे. राज्य शासनाला शेतकर्‍यांची थट्टा करायला लाज वाटत नाही. 

राज्य सरकार दगाबाज आहे. दगाबाज लोकांशी दगाबाजी करायला काहीही गैर नाही.

शेतकरी राजा रडतोय. त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. विमा तर बंदच केला आहे.

शेतकरी विमा भरतो तेवढाही विमा मिळत नाही.

शेतकरी राज्य सरकारच्या मंत्र्यांना आगामी काळात भरपाई मिळाली नाहीतर घेरतील. असा इशारा ठाकरेंनी या दौऱ्यात दिला.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात हिंदूनी मुले दोन पेक्षा जास्त जन्म घालावी. आणि राज्य सरकार दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळत आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी नको मात्र हमीभाव द्या असे शेतकरी म्हणतात. शेतकरी स्वाभिमानी आहे त्याला राज्य सरकारची भीक नको. शेतकरी हक्क मागतोय.

शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. त्याला कर्जमाफी आणि हेक्टरी 50 हजार रुपये भरपाई हवी आहे. राज्य सरकार निवडणुक आल्यानंतर जातीयवाद करणार आहे. आपण शेतकरी म्हणुन एकत्र आलो पाहिजे.

केंद्रीय पत्रक दोन दिवसात काय माहिती घेणार आहे असा मला प्रश्न आहे. आगामी काळात शेतकरी जमीन नागरतो त्याचप्रमाणे राज्य सरकारला नाकारणार आहे. 

दगाबाज राज्य सरकारला मत हवेत त्यामुळे 30 जून पर्यन्त कर्जमाफी हवी असल्याचे सांगत आहे. कर्जमाफी नाही तोपर्यंत राज्य सरकारला मत नाही.

उद्धव ठाकरे यांचा सिरसाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव दौरा ...

थेट गावात चर्चा करण्यासाठी मी थेट आव्हान देतो.

मराठवाड्यात पाणी पडत नाही. पडला आता अतिवृष्टीच्या नुकसानी पोटी नाले तुटले आहे. पाणी साठवता येत नाही.

घर सोडून पळून जाणारे मुख्यमंत्री आहे. शेतकरी राज्याचा बाप आहे.

जगातले सर्वात मोठे पॅकेज कोणत्या खेकड्याने खाल्ले आहे. अशी टिका उध्दव ठाकरे यांनी केली.

पीक विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांचा हक्काचा पैसा घेऊ नका..

शेतकर्‍यांना फुकट नकोय हक्काचे पैसे द्या. माझे सरकार असताना शेतकर्‍यांना हमी भाव दिला होता. शेतकर्‍यांना कर्ज फेडता येत नसल्याने कर्जमुक्ती हवी आहे. 

राज्य सरकार सत्तेच्या मस्तीत आहे. मतचोरी मोठा घोटाळा आहे. असा आरोप ठाकरेंनी केला.

दरोडा घालणारे हे दगाबाज सरकार आहे - उध्दव ठाकरे 

निवडणुक आयोगाचा मालक भाजपा आहे. शेतकरी मेला तरी चालेल असे धोरण राज्य सरकारचे आहे.

दिवाळी गोड करणारे होते. दिवाळी झाली तरीही हे सरकार सण गोड करू शकले नाही.

कर्जमुक्ती करून मी कोणावर उपकार केले नाही. पाहिल्याच अधिवेशनात कर्जमुक्ती मी केली होती. शासकीय यंत्रणाच मी हाताशी घेतली होती.

महात्मा जोतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा टप्पा या सरकारने घोषित करून दाखवावा. हे पाकीट मार सरकार आहे. शेतकरी म्हणून एकवटने आवश्यक आहे.

महायुतीला मत नाही हेच कर्जमाफीचे औषध आहे.

जनावरे वाहून गेली त्याची भरपाई मिळाली नाही.

बिहार मध्ये कोणतीही समिती गठीत न करता दहा हजार दिले आहे. तसेच महाराष्ट्रात शेतकरी कर्जमुक्ती साठी राज्य सरकारने केली पाहिजे. अशी टिका

मराठवाड्यातील दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow