एमआयएमच्या आंदोलनात गाढव, अमित शहांच्या विरोधात पैठणगेट येथे अक्रामक आंदोलन

एमआयएमच्या आंदोलनात गाढव, अमित शहांच्या विरोधात पैठणगेट येथे अक्रामक आंदोलन
छत्रपती संभाजीनगर(डि-24 न्यूज) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्याविरोधात एमआयएम अक्रामक झाली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. गाडवावर अमित शहा यांचे पास्टर लावून वक्तव्याचा निषेध करण्यात आला. अमित शहा.....नारे तकबिर.... संविधान जिंदाबादचे कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. आंदोलकांनी हातात निळे झेंडे व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन हे आंदोलन केले. अमित शहा यांच्या राजीनाम्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली.
यावेळी एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी, माजी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, आरेफ हुसेनी, प्रांतोष वाघमारे, कुणाल खरात, युवक शहराध्यक्ष मोहम्मद असरार, भाई इम्तियाज आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






