एमडी ड्रग्स व तलवारसह आरोपी अटक, एक लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त...
एमडी ड्रग्ज व तलवारसह आरोपी अटकेत; १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर | दि. ३१ जानेवारी २०२६
पोलीस ठाणे जिन्सी गुन्हा क्रमांक २८/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २१(क), २२(क), २९ अन्वये दाखल गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण २०.६९ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज, एक तलवार असा सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यातील अटक आरोपी नामे शेख कलिम शेख सत्तार , वय 35, राहणार घर क्र.2-3-100/108 गल्ली नंबर 3, रविंद्र नगर, शाह बाजार, छत्रपती संभाजीनगर यास गुन्ह्याच्या तपासा दरम्यान विचारपूस केली असता आरोपीने त्याच्या राहत्या घराच्या पत्र्याच्या वर नशेसाठी वापरात येणारी एमडी ड्रग्स व एक तलवार लपवून ठेवल्याचे सांगितल्यावरुन १) १,२४,१४०.०० एमडी ड्रग्स २०.६९ ड्रग्स व लाल रंगाची म्यान असलेली स्टिलचे पाते व पिवळी मुठ असलेली तलवार मिळून आल्याने ड्रग्स तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात एकूण १२ आरोपी असून यापैकी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना १ फेब्रुवारी पर्यंत पीसिआर मंजूर केला आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा रविकांत गच्चे करत आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
तपासादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील विविध ठिकाणी सापळा रचून आरोपींकडून २०.६९ ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत सुमारे २०,६९० रुपये) तसेच लाल रंगाची तलवार जप्त करण्यात आली. सदर तलवार गुन्ह्यात वापरण्याच्या उद्देशाने आरोपींकडे ठेवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे शेख सोहेल उर्फ चाऊ शेख सत्तार, वय 23, राहणार बायजीपूरा, ग.नं.18, छत्रपती संभाजीनगर यास गुन्ह्यात अटक करुन आरोपीस मा.न्यायालयात हजर केले असता आरोपीची दि.3/2/2026 पावेतो न्यायालयाने पीसीआर मंजूर केला आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त मा. श्री. प्रविण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) मा. श्री. रणक नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. श्री. अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
What's Your Reaction?