काँग्रेसचे इब्राहीम पटेल यांच्या प्रचारार्थ रहेमानिया काॅलनीत प्रचारसभा...
इब्राहीम पटेल यांच्या प्रचारार्थ रहेमानिया काॅलनी येथे प्रचार सभा...प्रभाग 12 काँग्रेसमय
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 12 चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार इब्राहीम पटेल यांच्या प्रचारार्थ रहेमानिया काॅलनी येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने मतदारांची उपस्थिती होती. हातात पंजा व काँग्रेसचे झेंडे हाती घेवून कार्यकर्त्यांनी इब्राहीम पटेल तुम आगे बढो हम तुम्हारे साथ, काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ, विकास सिर्फ काँग्रेस हि कर सकती है, विरोधी उमेदवारो को हराओ काँग्रेस को लावो अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. प्रभागातील पाणी प्रश्न, ड्रेनिज, आरोग्य व शिक्षण आणि बेरोजगारी मिटवण्यासाठी काय करणार. मागिल नगरसेवकांनी विकास न करता खिसे भरले. यावेळी प्रभागातील चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा जे आश्वासन दिले ते इमानदारीने पूर्ण करु असे आश्वासन इब्राहीम पटेल यांनी दिले. याप्रसंगी चारही उमेदवारांनी एमआयएम वर आपल्या भाषणात हल्लाबोल केला. काँग्रेसला मत म्हणजे भाजपाला मत असा प्रचार प्रभागात एमआयएम करत आहे त्यांना हे माहित नाही हा मुस्लिम बहुल प्रभाग आहे येथे भाजपा व शिवसेनेचा उमेदवार नाही मग या भुलथापांना बळी न पडता काँग्रेसच्या पंजावर मते द्या असे आपल्या भाषणात उमेदवार डॉ.फिरदौस फातेमा रमजानी खान यांनी सांगितले. याप्रसंगी चार मतांचा प्रयोग कसा करायचा व काँग्रेसची निशाणी कोणत्या नंबरवर आहे याची जनजागृती प्रचार सभेत करण्यात आली
.
What's Your Reaction?