काँग्रेस केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन...!
 
                                लोकशाहीचे रक्षण व मतदारांच्या हक्कासाठी राष्ट्रीय मतदार दिनी जोरदार आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. निवडणूक आयोगाच्या या कृत्यांविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी
शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे आज राष्ट्रीय मतदार दिनी जोरदार आंदोलन करुन जनजागृती करण्यात आली व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 50 लाख मतदार कसे वाढले...? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतर रात्रीच्या अंधारात 76 लाख मतदान कसे वाढले..? याचे पुरावे द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती पण अजून ही आकडेवारी दिलेली नाही. निवडणूक आयोगाला अशी माहिती देता येणार नाही असा कायदाच आता केंद्रातील भाजपा सरकारने केला आहे. हा कायदा म्हणजे निवडणूक आयोग व भाजपाने मतदारांच्या मतदानावर टाकलेला दरोडा लपवण्याचा प्रकार आहे. असे मत यावेळी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जगन्नाथ काळे, लहू शेवाळे, डॉ.जफर खान, इब्राहिम पठाण, इक्बालसिंग गिल, महेंद्र रमंडवाल, डॉ. पवन डोंगरे, अकेफ रजवी, निलेश आंबेवाडीकर, इंजि. विशाल बन्सवाल, शेख अथर, कैसर बाबा, सलीम खान, शेख फय्याजोद्दीन, गौरव जैस्वाल, साहेबराव बनकर, नदीम सौदागर, साजिद खान, तय्यब पटेल, मुदस्सर अन्सारी, रमाकांत गायकवाड, शफिक शहा, लतीफ पटेल, योगेश बहादुरे अरुणा लांडगे, शेख मुज्जम्मील, सय्यद युनूस, उत्तम दणके, मनोज शेजूळ, बाबासाहेब बोरसटे, भाऊसाहेब नवगिरे, राजू मगरे, श्रीकांत रणभरे, पळसकर गुरुजी, अशोक डोळस, पप्पूराज ठुबे, अनिता भंडारी, चंद्रप्रभा खंदारे, शिरीष चव्हाण, सुहासिनी घोरपडे, योगेश थोरात, हकीम पटेल, प्रमोद सदाशिवे, मसरूर सोहेल खान, इद्रिस खान यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            