किरकोळ वादातून पैठणगेट परिसरात युवकाचा खून...
किरकोळ वादातून पैठणगेट परिसरात युवकाचा खून...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10 (डि-24 न्यूज) : पैठणगेट भागातील सब्जी मंडीकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये किरकोळ वादातून एका युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना सोमवार, 10 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत इमरान अकबर कुरेशी (वय 33, राहणार सिल्लेखाना) या युवकाचा मृत्यू झाला असून, आरोपी पसार झाला आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
क्रांती चौक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 10.30 वाजेच्या दरम्यान पैठण गेटसमोरील सब्जी मंडीकडे जाणाऱ्या गल्लीत असलेल्या एमआर मोबाईल या दुकानासमोर इमरान कुरेशी व दुकानात काम करणाऱ्या एका युवकामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद तीव्र होताच दुकानात काम करणाऱ्या युवकाने चाकू काढून इमरानवर वार केले. या हल्ल्यात इमरान गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. वाद कशामुळे झाला पोलिस चौकशीत समोर येईल.
घटनेची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलवला आहे.
दरम्यान, आरोपी युवक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे पैठणगेट परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर घाटी रुग्णालयात गर्दी जमली आहे.
What's Your Reaction?