कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...

कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) -
कृषीमंत्री काशिनाथ कोकाटे हे या ना त्या कारणाने नेहमी वादात सापडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कृषीमंत्री यांचा कार्यकाळ व त्यांचे शेतक-यांच्या विषयीचे वागणे घाणेरडे व चुकीचे आहे. विधानसभेत मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला हि शरमेची बाब आहे. अनेकवेळा त्यांनी शेतक-यांबद्दल चुकीची विधाने केली आहे. तीन महीन्यात 750 शेतक-यांनी आत्महत्या केली दररोज शेतक-यांच्या आत्महत्या होत आहे. कृषीमंत्री यांना शेतक-यांशी काही देणेघेणे नाही. कर्जमाफी होत नाही. हमीभाव मिळत नाही पिक विमा मिळत नाही. खते बी-बीयानाचे भाव कमी होत नाही. हे सगळे सोडून विधानसभेत रमी खेळणारा हा बेदरकार कृषीमंत्री यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला. अशा कृषीमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत कदम, मुश्ताक अहेमद, मोतीलाल जगताप, मुन्नाभाई व पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






