कोविड योध्दांचे कायम नोकरीसाठी साखळी उपोषण सुरु

 0
कोविड योध्दांचे कायम नोकरीसाठी साखळी उपोषण सुरु

कोविड योध्दांना वापरा आणि हाकलुन द्या ही शासनाची भुमिका !... जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयटकचे साखळी उपोषण सुरु !          

औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय औरंगाबादयेथील 98 कथीत कंत्राटी कामगारांना कोविड योध्दांना सेवेत सामावून घ्या या मागणीसाठी आजपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली. जोपर्यंत कायम नोकरीचा आदेश मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहील असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला.

याबाबत असे की, कोविड महामारीच्या दोन्हीही लाटेत ज्यांच्यामुळे शाकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,घाटी व जिल्हा प्रशासनाला मोठी मदत झाली, त्यांना

काव्हीड योध्दा म्हणून घाटी प्रशासनाने प्रमाणपत्रही दिले. त्यांच्यासाठी टाळया-थाळया वाजवण्यात

आल्या, दिवे विझवण्यात आले, पुष्प वृष्टी करण्यात आली, जेंव्हा कोविड वार्डात जायला भिती

वाटत होती, तेंव्हा वरील 98 कथीत कंत्राटी सफाई कामगारांनी कोव्हीड रुग्णांची सुश्रुशा केली,

वयोवृध्द रुग्णांचे डायपर बदलले, त्यांना पाणी, जेवण दिले, मृत्यू झालेल्या कोव्हीड रुग्णांचे

पार्थीव शरीर व्यवस्थीतपणे अंत्य संस्कारासाठी रवाना केले. अशा प्राणांची बाजी लावणा-या व

कठीण परिस्थीतीत प्रशासनाला मदत करणा-या 98 कोव्हीड योद्यांना निराधार केले जात आहे.

गरज सरो कोविड योध्दा मरो, असा प्रकार सुरु आहे. तेव्हा विशेष बाब म्हणून, तसेच कोविड काळातील या 98 कोव्हीड योद्यांच्या कामाचे

साक्षीदार म्हणून आपण त्यांना सेवेत सामावुन घ्यावे, प्रत्येक कथीत कंत्राटी सफाई कामगारांच्या

नावाने सरकारी तिजोरीतून दरमहा जवळपास 15000 रुपये खर्च होतात, परंतू प्रत्यक्षात कामगारांच्या हातात जवळपास 10,000 रुपये दरमहा एवढीच रक्कम मिळते. तेंव्हा सरकारी तिजोरीतून त्याच्या नावे बाहेर पडणारे दरमहा 15000 रुपये एवढी तरी त्यांना थेट मिळावे, जेणेकरुन सरकारी तिजोरीवरही ताण येणार नाही व प्रशासनाला पडत्या काळात मदत करणा-या प्रामाणीक, कष्टाळू अशा 98 योध्दांच्या कामाची जाण ठेवली, असा देखील संदेश कामगारांमध्ये जाईल जिल्हाधिकार्यांमार्फत योग्य तो न्याय मिळेल अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, घाटी येथे जवळपास अधिकृत 1700 रुग्ण क्षमता असतांना त्यापेक्षा 3 पट. जास्त रुग्ण भरती होतात, रोज जवळपास रुग्ण व नातेवाईक मिळुन 10,000 नागरीक घाटी

हॉस्पीटलमध्ये येतात. सद्या स्थीतीत घाटी हॉस्पीटलमध्ये जवळपास 1000 चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची आवश्यकता आहे. घाटीत रुग्णांना स्ट्रेचरवर व व्हील चेअरवर नेण्याचे काम

नातेवाईकांनाच करावे लागते, 1000 सफाई कामगारांची भरती केल्यास रुग्ण सेवा आणि

स्वच्छता योग्य रितीने राखता येईल. घाटीतील अस्वच्छता हा कायम चर्चेचा विषय ठरत आहे

पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे उपोषनार्थी 98 सफाई कामगारांवर कामाचा ताण वाढत आहे,

टीसीएस कंपनी मार्फत 148 कामगारांच्या भर्तीचा निर्णय 98 उपोषनार्थी कोविड योध्दांवर

अन्याय करणारा आहे. यापुर्वी घाटी प्रशासन, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी

दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तसेच विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर

केल्याप्रमाणे, तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे उपोषनार्थी 98 कथीत

कंत्राटी कामगार काव्हीड योद्यांना सेवेत सामाऊन घ्या, त्यानंतर उर्वरीत जागांसाठी भरती करावी

अशी मागणी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या मागणीकडे

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 

नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषन सुरु करण्यात आले आहे. लवकरात लवकर न्याय देऊन उपोषन संपवण्यास मदत करावी, सदर उपोषनार्थी रुग्ण सेवेस अडथळा न निर्माण करता, प्रशासनास सहकार्य करुन शासकीय वैद्यकीय

महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे रोज डयुटी करुन जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

समोर उपोषणात सहभागी होत आहेत. ही बाबही निवेदनात नमुद करण्यात आली आहे. यावेळी उपोषण मंडपात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी डाॅ अरविंद लोखंडे यांनी निवेदन स्विकारले. या वेळी अॅड अभय टाकसाळ, काॅ राजु हिवराळे,

अरुणा कारभारी वाहुळ , बेबी काकडे, आरेफसाद शाकीर, जमीर शेख, विदया हिवराळे, नंदा हिवराळे, कविता जोगदंड, शिलाबाई मुजमुले, निता भालेराव, चारू शिला जावळे, मनिषा हिवराळे, वंदना जोगदंडे, आम्रपाली जोगदंडे, दिपीका पंडित, माया हिवराळे ,मनिषा सातपूते, संगिता सिरसाट, सोनी नितनवरे, मनिषा रातपुते ,अजहर शेख

,आनंद परघने, विजय नागोबा वनिता सातदिवे, प्रमिला रत्नपारखे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow