खबरदार...ट्रोल आर्मी वर भडकल्या डॉ. फिरदौस फातेमा

खबरदार...ट्रोल आर्मी वर भडकल्या डॉ. फिरदौस फातेमा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) जगविख्यात मुस्लिम धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी मतदान करावे यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून नाही तर वैयक्तिक पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या उमेदवारांना पाठिंबा दिला नाही त्यांचे कार्यकर्ते मौलाना सज्जाद नोमानी यांना ट्रोल आर्मी सोशलमिडीयावर ट्रोल करुन अपशब्दाचा प्रयोग करत आहे यामुळे मुस्लिम समाजात नाराजी व्यक्त केली जात आहे. यानंतर त्यांच्या विरोधात अपशब्दांचा प्रयोग केला गेला तर सहन केले जाणार नाही असा इशारा ट्रोल करणा-यांना डॉ . फिरदौस फातेमा रमजानी खान यांनी दिला आहे. औरंगाबाद पूर्व मधून इम्तियाज जलील व औरंगाबाद मध्य मधून पाठिंबा न देता अन्य उमेदवारांना पाठिंबा दिल्याने ट्रोल आर्मी सक्रीय झाली आहे. मौलाना सज्जाद नोमानी यांच्या निर्णयाला देशात मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीत याचा परिणाम दिसून आला. संविधानाच्या रक्षणासाठी व महाराष्ट्रात आणि देशात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणा-या विरोधात ते सर्व समाजात जनजागृती करत आहे व राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी योग्य उमेदवाराला या निवडणुकीत निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी राज्याच्या हितासाठी घेतलेला आहे यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही. समाजाने त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले परंतु वैयक्तिक पातळीवर हा पाठिंबा दिला गेला नाही. त्यांनी सांगितलेल्या उमेदवाराला मत द्या हे पण सांगितले नाही लोकशाहीत तो अधिकार आपल्याला आहे. परंतु हि एमआयएमची ट्रोल आर्मी पक्षाचे नाव न घेता एमआयएमला सोडचिठ्ठी देत महीला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या डॉ. फिरदौस फातेमा रमजानी खान पत्रकार परिषदेत ट्रोल आर्मी वर चांगल्याच भडकल्या.
शहरात नेरेटिव सेट केले जात आहे ते मौलाना लखनौचे आहेत त्यांचे महाराष्ट्रात ऐकले जाणार नाही. त्यांना माहीत असले पाहिजे ते जगविख्यात मुस्लिम धर्मगुरु आहे. ते समाजाच्या व देश हितासाठी बोलतात. लोकशाही मजबूत झाली पाहिजे संविधान वाचले पाहिजे. समाजावर अन्याय झाला तर ते वाचा फोडतात, समाजात एकतेचा संदेश ते देतात यासाठी देशभरात दौरे करत आहे. एमआयएमचे नाव न घेता त्या पक्षाच्या प्रवक्त्याने एक व्हिडिओ जारी करुन मौलाना सज्जाद नोमानी यांच्या विरोधात जी पोस्ट आली ती फेक पोस्ट बाणवून एमआयएमला बदनाम करण्यासाठी व्हायरल करण्यात आली असे सांगितले मग फेक पोस्ट व्हायरल झाली असेल तर सायबर क्राईममध्ये तक्रार द्यावी त्या व्यक्तींविरोधात कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी फिरदौस फातेमा यांनी केली आहे.
पुढे बोलताना एका उर्दू दैनिकात एक बातमी आली मौलाना सज्जाद नोमानी यांनी कोणत्या आधारावर या उमेदवारांना पाठिंबा दिला. सर्वे करणारी कोणती टिम होती ते उघड करावे असे प्रश्न उपस्थित केले गेले आहे मग एमआयएमने जेव्हा उमेदवार जाहीर केले त्यांचा सर्वे कोणी केला त्या टिमचे नाव जाहीर करावे. तुम्ही अगर मौलाना सज्जाद नोमानी यांचा निर्णय मानत नसाल तर आम्ही हैदराबाद येथून आलेल्या नेत्यांच्या सांगण्यावरुन मतदान कशाला करायचे असा प्रश्न डॉ.फिरदौस फातेमा यांनी उपस्थित केला आहे. जे पक्ष व उमेदवार धर्माच्या नावावर मते मागत असतील तर त्यांच्यापासून मतदारांनी सावधान राहावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
What's Your Reaction?






