गोवंश कायद्याचे पालन करत आहोत झुंडशाही करुन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणा-यांना रोखावे - जावेद कुरेशी

 0
गोवंश कायद्याचे पालन करत आहोत झुंडशाही करुन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणा-यांना रोखावे - जावेद कुरेशी

गोवंश कायद्याचे पालन करत आहे परंतु झुंडशाही करुन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणा-यांना रोखावे - जावेद कुरेशी

गाय आणि बैलांना राष्ट्रीय पशु घोषित करण्याचा ऑल इंडिया जमियतूल कुरैशची मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश कायद्याचे कडक पालन करुन गोवंशाची हत्या, वाहतूक व खरेदी विक्रीवर कडक नजर असणार आहे. गोवंशाची हत्या केल्यास मकोका कायद्याअंतर्गत पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. आज दुपारी ऑल इंडिया जमियतूल कुरैशची पत्रकार परिषद झाली यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष जावेद कुरेशी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्रात गोवंश कायद्याचे पूर्णपणे पालन करणार आहे. गाय किंवा बैलांची कत्तल केली जाणार नाही. सरकारने गाय आणि बैलांना राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्याची मागणी मुस्लिम धर्मगुरु अर्शद मदनी यांनी केली आहे त्या मागणीला आमच्या संघटनेचा पाठिंबा आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एकतर्फी कार्यवाही करु नये. काही हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते गोरक्षकाच्या नावावर रस्त्यावर उतरून गाड्या अडवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. कायदा हातात. पोलिसांना गाडी चेक करण्याचा अधिकार असताना ते कार्यकर्ते हे काम करत आहेत. रस्त्यावर खिळ्याची पट्टी ठेवून गाडी अडवतात त्या गाडीमध्ये गोवंश नसताना गाडीची तोडफोड करुन आर्थिक नुकसान करतात. म्हशी व बोकडाच्या व इतर साहित्याच्या गाडी अडवण्याची भीती आहे. गोवंश हत्या करणा-यांवर मकोका लावता मग विना कारण गाड्या अडवून कायदा हातात घेणा-या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी. हैदराबाद येथील घटनेत एक गाडी अडवण्यात आली त्यामध्ये प्लाॅयवूड निघाले. अशी घटना वारंवार घडत आहेत यावर प्रतिबंध घातला पाहिजे. विनाकारण कुरेशी समाजाला टार्गेट केले जात आहे. समाजामध्ये सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि शांतता कायम राहावी यासाठी राज्यात गोवंश कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवंश कायद्यामुळे आर्थिक नुकसान...

ज्या कंपन्या बीफचे विदेशात निर्यात करुन व्यापार करतात त्यांच्यावर कारवाई केली जात नाही तर छोटे व्यावसायिकावर कार्यवाई केली जाते. गो हत्याबंदी कायदा मोगल, इंग्रज राजवटीत सुध्दा होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने तो कायदा कायम ठेवला परंतु सन 2015 मध्ये महाराष्ट्र शासनाने गोवंश कायदा बनवल्यानंतर शेतकरी व बीफचे व्यवसाय करणा-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हैस किंवा त्यांचे वंशाच्या मांस विक्री केली तरी संशयाने पाहिले जात आहे. न्यायालयात गोवंश कायदा विरोधात कायदेशीर लढा चालू आहे तो लढत राहणार अशी माहिती पत्रकार परिषदेत जावेद कुरेशी यांनी दिली आहे.

या पत्रकार परिषदेला ऑल इंडिया जमियतूल कुरैशचे मराठवाडा अध्यक्ष हाजी इसा कुरैशी , उस्मान कुरेशी, सिराज कुरेशी, नौशाद कुरेशी, निसार कुरेशी, हाजी हाफीज रियाज आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow