टर्फ क्रीकेट स्पर्धेत नारेगाव मराठी व उर्दू अंतिम फेरीत, झुम्बा डान्सचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद

 0
टर्फ क्रीकेट स्पर्धेत नारेगाव मराठी व उर्दू अंतिम फेरीत, झुम्बा डान्सचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद

मनपा आंतरशालेय माध्यमिक विभागाच्या टर्फ वरील क्रिकेट स्पर्धेत नारेगाव मराठी व नारेगाव उर्दू शाळा अंतिम फेरीत

 झुम्बा डान्स चा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)

आम्हाला खेळू द्या या योजनेअंतर्गत मनपाच्या विद्यार्थ्यांना खेळण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत. तसेच सर्व शाळांमध्ये क्रीडा शिक्षक उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी वेगवेगळ्या खेळांमध्ये प्राविण्य मिळवत आहे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत , यांच्या मार्गदर्शना खाली टर्फ वरील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आज माध्यमिक विभागाच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गणेश दांडगे समन्वयक शिक्षण विभाग यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर हेमा धामुने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी झुंबा डान्सचा आनंद घेतला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या क्रिकेट स्पर्धा प्रियदर्शनी शाळेतील टर्फ वर होत आहेत.

  या स्पर्धेचे आयोजन प्रियदर्शनी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी केले आहे.

या गटामध्ये 17 संघ सहभागी झाले आहेत,

शिक्षकांच्या मॅचेस 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजता प्रियदर्शनी शाळेच्या टर्फ वर सुरू होतील. 

 स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रियदर्शनी शाळेच्या टर्फ वर 3 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.

या कार्यक्रमास सर्व मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज झालेल्या सामन्यांच्या यशस्वीतेसाठी शशिकांत उबाळे, विजय कोल्हे, फिरोज खान पठाण, भरत फुसे, काकासाहेब जाधव, चंद्रप्रकाश जाधव, सचिन लवेरा ,प्रियांका गारखेडे, दिपाली बजाज आणि क्रीडा शिक्षक यांनी परिश्र

म घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow