टिईटी, संच मान्यता विरोधात शिक्षक संघटनांनी काढला मोर्चा...

 0
टिईटी, संच मान्यता विरोधात शिक्षक संघटनांनी काढला मोर्चा...

टीईटी, संच मान्यता विरोधात शाळा बंद करून सर्व शिक्षक संघटना एकवटल्या

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.5(डि-24 न्यूज) -शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्यता, नवीन संच मान्यतेच्या जाचक निकषामुळे शाळा बंद होण्याचा निर्माण झालेला धोका रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना एकवटल्या. या सर्व जाचक अटीच्या विरोधात आज शुक्रवारी (दि.5) जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 2 वाजता शिक्षकांनी मोर्चा काढला.

पदोन्नती प्रक्रिया, कंत्राटी कर्मचारी भरती धोरणामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या असंतोषाला वाट करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनात जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त शिक्षक संघटना एकवटल्या होत्या.

1 सप्टेंबर रोजी टीईटी अनिवार्यतेच्या संबंधाने सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर अनेकविध पद्धतीने संघटनांकडून शिक्षकांच्या सेवेला संरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाला साकडे घालण्यात आले होते. देशातील अनेक राज्य सरकारांनी याबाबतीत पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत. काही राज्यांनी केंद्र शासनाकडे शिक्षकांच्या संरक्षणार्थ अनुकूल प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र राज्य सरकारने याबाबत साफ दुर्लक्ष केले आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या 

मोर्चात सहभागी संघटना

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक सेना, शिक्षक भारती, मराठवाडा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शिक्षक संघ संभाजीराव थोरात गट,

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना,

शिक्षक समिती उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक परिषद उन्हाळे गट, शिक्षक भारती मा खाजगी,

पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, मुफ्टा संघटना,

महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षकेतर संघटना

महाराष्ट्र शिक्षक परिषद,

छत्रपती संभाजीनगर शिक्षकेत्तर महासंघ, मुख्याध्यापक महासंघ,

राष्ट्रवादी शिक्षक संघ (मा)

राष्ट्रवादी शिक्षक संघटना,

संस्थाचालक संघटना

भाजप प्रणित शिक्षक संघटना,

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ

क्रांती शिक्षक सेना,

महाराष्ट्र राज्य संस्थाचालक संघ

मुख्याध्यापक संघ,

हॅपी टू हेल्प संघटना 

आदी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी शाळा बंद करून आंदोलनात सहभागी झाले होते.

काय होत्या प्रमुख मागण्या

संच मान्यता निकषांमुळे शाळा व शिक्षकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या निकषांत बदल करावेत, टीईटी अनिवार्यतेमुळे थांबलेली पदोन्नती प्रक्रिया सुरू करावी, मूळची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, मुख्यालयी वास्तव्याची अट शिथिल करावी, सर्व विषय शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ द्यावा, शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करावी, बीएलओ व अशैक्षणिक कामे,

अनाठायी उपक्रम बंद करावीत, नगरपालिका, शिक्षणसेवक पद, कंत्राटी शिक्षक भरती रद्द करावी, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

टीईटी, जाचक संच मान्यतेसह इतर मागण्यांसाठी सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला त्यामुळे शुक्रवारी जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांसह हजारो शाळा बंद होत्या. टीईटीला राज्यातील सर्वच शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. या विरोधाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र राज्यभरातून दिसत आहे.

केंद्र शासनाने आर.टी.ई. कलम 23 तसेच अधिसूचनेत दुरुस्ती करावी. यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव सादर करावा. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात महामोर्चा काढण्यात येईल.

विजय साळकर,जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती.

                                                                                       टीईटी व 15 मार्च 2024 चा संच मान्यते संबंधित शासन निर्णय अन्यायकारक आहे या विरोधात आज छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 3000 शाळा बंद करून सामूहिक रजा घेऊन 19 हजार शिक्षकांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शिक्षकांनी मोर्चा काढून माननीय जिल्हाधिकारी स्वामी साहेब यांना मागण्यांचे निवेदन दिले यानंतरही सरकारने मागण्यांची दखल घेतली नाही तर बेमुदत शाळा बंद करू यापेक्षा तीव्र आंदोलन उभारून विजय साळकर मुख्य समन्वय शिक्षक समन्वय समिती छत्रपती संभाजीनगर मोर्चाच्या समारोपप्रसंगी विजय साळकर मुख्य समन्वयक शिक्षक समन्वय समिती जिल्हा छत्रपती संभाजीनगर एम के देशमुख, माजी शिक्षणाधिकारी तेजराव पाटील गाडेकर माजी शिक्षणाधिकारी चंद्रकांत चव्हाण,शिक्षक महासंघ खाजगी, गोविंद उगले महासचिव जुनी हक्क पेन्शन संघटना दीपक पवार शिक्षक सेना संतोष ताठे शिक्षक भारती यांनी भुमिका विशद केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow