डॉ.गफ्फार कादरींचे एमआयएम वर गंभीर आरोप, पक्षाला दिला घरचा आहेर...!

डॉ.गफ्फार कादरींचे एमआयएम वर गंभीर आरोप, पक्षाला दिला घरचा आहेर...!
बैठकीचा व्हिडिओ व्हायरल होताच पक्षात खळबळ....पक्षाला मजबूत करण्यासाठी पैसे खर्च करून वेळ घालवला आणि पक्षाचे अध्यक्षाना 23 सप्टेंबर रोजी लिहलेल्या पत्राचे उत्तर मिळत नाही... हैदराबाद येथे गेलो तरीही ओवेसींनी पाच मिनिटे चर्चा करण्यासाठी वेळ दिला नाही, सर्व निर्णय इम्तियाज जलील घेत असेल तर आम्ही काय करायचे... औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ शकतो एवढी मेहनत आम्ही येथे केली आहे पण अतुल सावे यांना छूपा पाठिंबा देऊन नवखा उमेदवार द्यायचा का असा सवाल डॉ.गफ्फार कादरी यांनी आपल्या भाषणात करुन खळबळ माजवून दिली... माध्यमांसमोर पत्रकार परिषद घेऊन पत्र व विविध गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.8(डि-24 न्यूज), एमआयएमने पाच उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी यांची बेचैनी वाढली होती ती खदखद आज त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलून दाखवली. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून ते पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक असताना पक्षाचे सुप्रीमो असदोद्दीन ओवेसी यांनी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर केली परंतु कोणत्या मतदारसंघातून ते लढणार गुलदस्त्यात असल्याने संभ्रम निर्माण झाला. म्हणून आज प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांनी आज त्यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक बोलावून पक्षाला घरचा आहेर दिला व पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.
आपल्या भाषणात त्यांनी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली. फडणवीस यांचे फोन एक बेलमध्ये उचलतात परंतु पक्षाचे कार्यकर्ते किंवा आमचा फोन उचलत नाही असा गंभीर आरोप केला. पक्षाने उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्ते व समर्थकांशी चर्चा करून वेगळा विचार करावा लागेल. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मदत करत असल्याचा आरोपही आपल्या भाषणात त्यांनी केला असल्याने पक्षात बंडखोरी तर होणार नाही अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी पक्षात नवीन येणाऱ्यांची उमेदवारी जाहीर केली परंतु जे कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत त्यांचा विचार केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. मागिल काही वर्षांपासून एमआयएम मधील अंतर्गत कलह आज समोर आला असल्याने पक्षात फुट पडणार असे आजच्या बैठकीवरुन दिसून येत आहे. विधानसभा निवडणुक जाहीर होण्याच्या अगोदर दुसऱ्या पक्षात जाण्याचा इशाराच डॉ.कादरी यांनी देऊन टाकला आहे.
What's Your Reaction?






