तलाठ्याचा बळी मानसिक विकृतीने, फेरफार प्रलंबित नव्हता, तलाठी संघाचा लक्षवेधी बंद...!

 0
तलाठ्याचा बळी मानसिक विकृतीने, फेरफार प्रलंबित नव्हता, तलाठी संघाचा लक्षवेधी बंद...!

तलाठ्याचा बळी मानसिक विकृतीने, फेरफार प्रलंबित नव्हता, लक्षवेधी कामबंद आंदोलन....

तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचा उद्याच्या बंदला पाठिंबा, महसूल विभागात कामकाज होणार ठप्प.‌..

छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) राज्य तलाठी संघाच्या वतीने निवेदन सादर करण्यांत येते की, मौजे आडगांव रंजे, ता. वसमत, जि. हिंगोली येथे भरदिवसा तलाठी कार्यालयात तलाठी संतोष देवराव पवार यांचा शासकीय कामकाज करत असतांना चाकु भोसकुन खून करण्यात आला. महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचा-यासोबत खुनाची घटना घडल्याचा प्रकार अत्यंत भ्याड, निंदणीय व घृणास्पद असुन यामध्ये आरोपोची मानसिक विकृती दिसून येते. या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघ अत्यंत तीव्र, संवेदनशील व दुःखद भावनेने निषेध व्यक्त करतो.

वास्तविक "फेरफार प्रलंबित असल्याने खून अशा प्रकारच्या बातम्या

पसरविल्या जात आहे. मात्र संबंधित व्यक्तीचे कोणत्याही प्रकारचे फेरफार प्रकरण

तलाठी यांचेकडे प्रलंबित नव्हते. केवळ आपल्या कुटुंबातील शेतजमीन नातेवाईक कुणालातरी हाताशी धरुन परस्पर त्यांच्या नावावर करुन घेतील काय ? अशा संशयावरुन आरोपीने मयत दुदैवी तलाठी संतोष देवराव पवार यांचा खून केल्याचे

मिळालेल्या माहितीवरुन कळते. परंतु चुकीच्या बातम्या पसरविल्याने यामध्ये विनाकारक तलाठी संवर्गाला बदनाम केले जात आहे ही बाब अन्यायकारक आहे. यामधील खुलासा आपल्या स्तरावरुन सुध्दा व्हावा, हे अपेक्षित आहे.

या घटनेमुळे मयत तलाठी संतोष देवराव पवार यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले असून केवळ संशयामुळे; त्यांचा कोणताही दोष नसतांना आरोपीच्या

मानसिकतेमुळेच त्यांना जीव गमवावा लागला. या घटनेमुळे राज्यातील तलाठीच नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचारी यांचे खच्चीकरण झाले असून कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या

घटनेचा राज्य तलाठी संघ अतिशय तीव्र शब्दांत (व्यक्त न होवू शकणा-या) निषेध व्यक्त करीत आहे व खालील प्रमाणे आपल्या निदर्शनास आणून देत आहे.

1) राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी हे घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन उद्या एक दिवसीय लक्षवेधी काम बंद आंदोलन पुकारत आहे.

3) आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडुन प्रयत्न व्हावेत तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवुन

व तज्ञ जेष्ठ सरकारी विधिज्ञामार्फत कायद्यानुसार कडक शिक्षा देण्यांत यावी, यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत.

3) मयत तलाठी यांच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुले, आई, वडील, 2 भाऊ व बहीण असा परिवार असून पैकी मयत तलाठी हे सर्वांत मोठे व कर्ते असल्याने त्यांच्या कुटुंबियास किमान 50 लाख रुपयांची विशेष तात्काळ मदत शासनाने त्वरीत जाहीर करावी.

4) भविष्यात त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या वारसांना

अनुकंपाद्वारे तात्काळ शासकीय सेवेत समाविष्ट करुन घ्यावे. 5) राज्यात कलम ३५३ अजामिनपात्र गुन्हा हा जामिनपात्र करण्यांत आला

आहे. या सारख्या घटना घडु नयेत व सरकारी कर्मचाऱ्यांवर वारंवार होणारे हल्ले होवू नयेत यासाठी कायद्यात दुरुस्ती करुन कलम 353 हे अजामिनपात्र करण्यात यावे. एवढेच नव्हे तर या सारखे इतर काही कायदे अस्तित्वात आणून कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा

व संरक्षण मिळावे.

वरील प्रमाणे बाबी आपल्या निदर्शनास आणून देत असुन

राज्यातील तलाठीच नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावना विचारात घेवुन योग्य ते संरक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा व पुन्हा अशा घटना होवु नये म्हणून सदरचे प्रकरण फास्ट ट्रैक न्यायालयात चालवुन आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने प्रसिध्दीपत्रकात केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow