तो शब्द सरकारी दस्तावेजात, एफआयआर विरोधात न्यायालयात जाणार - इम्तियाज जलिल

तो शब्द सरकारी दस्तावेजात, एफआयआर विरोधात न्यायालयात जाणार - इम्तियाज जलिल
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आपल्या मुलांसाठी साजापूर येथे वर्ग-2 ची दहा एकर जमीन खरेदी केली ती जमीन एका विशिष्ट समाजासाठी राखीव होती त्या सरकारी महसूल विभागाच्या दस्तावेजात तो शब्द लिहिलेला होता तो शब्द पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. तो शब्द उच्चारल्याने माझ्याविरोधात पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी पाठवलेल्या कार्यकर्त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्या कागदपत्रांची शहानिशा न करता माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला. यावरुन पोलिस मंत्र्याची गुलामगिरी करत असल्याचे दिसत आहे. गृहमंत्र्यांनी हे बघावे काय चालले आहे पोलिस खात्यात. पोलिसांना आता मी न्यायालयात खेचणार आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी जी तत्परता दाखवली गुन्हा दाखल केला म्हणून एफआयआर विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले महाराष्ट्र शासनाच्या सरकारी कागदपत्रांवर दोनदा तो शब्द लिहिला गेला आहे
गृहमंत्र्यांना इम्तियाज जलिल यांना निवेदन केले की माझ्यावर जो गुन्हा दाखल करण्यासाठी पालकमंत्र्यांनी कोणत्या पोलिस अधिका-यांना फोन करुन दबाव आणला ती काॅल रेकाॅर्डींग मागवावी. ज्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी माझ्यावर शहानीशा न करता गुन्हा दाखल केला त्यांना न्यायालयात उत्तर द्यावे लागेल. तो शब्द महसूलच्या सरकारी कागदपत्रात आल्याने पालकमंत्री जिल्हाधिकारी विरोधात तक्रार देणार का असा असा सवाल जलिल यांनी पालकमंत्र्यांना केला आहे.
जे नेते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते, इम्तियाज जलिल मुर्दाबादचे नारे देत होते ते पालकमंत्र्यांच्या बचावाखाली नाही तर नाही गेले तर सात कोटींची फाईल मंजूर होणार नाही या धाकाने ते आले होते. त्यांच्यावरही जलिल यांनी टिका केली आहे. समाजकल्याण विभागाची सात कोटी रुपयांच्या फाईल मंजूर होणार नाही म्हणून ते तक्रार देण्यासाठी गेले होते असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत लावला.
What's Your Reaction?






