दिवाळीच्या दिवशी शहरात तरुणाचा भोसकून खून...!
दिवाळीच्या दिवशी शहरात तरुणाचा भोसकून खून...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - दिपावलीच्या फटाक्यांची शहरात आतिषबाजी सुरू असताना लोक आनंदात सण साजरा करत असताना रामनगर भागातून वाईट बातमी आली आहे. विपूल चाबुकस्वार या तरुणाचा दोन मित्रांनी चाकूने उड्डाणपुलाखाली भोसकून खून केल्याने खळबळ उडाली आहे. या खूनाची घटना सिसिटीव्हित कैद झाली आहे. पोलिसांनी आशिष चौतमल, सुबोध देहाडे या दोन मित्रांना अटक केली आहे. मुकुंदवाडी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
What's Your Reaction?