देशातील पाच लाख रेशन दुकानदार संपावर जाणार...?
बेमुदत संपावर जाण्याचा रेशन दुकानदारांचा इशारा
औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) प्रलंबित मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. देशपातळीवरील संघटना ऑल इंडिया फयर प्राईज डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली 1 जानेवारी पासून रेशन बंद आंदोलन करणार असल्याची माहिती डि-24 न्यूजला महासंघाचे अध्यक्ष डी.एन.पाटील यांनी दिली आहे. देशातील पाच लाख व महाराष्ट्रातील 53 हजार रेशन दुकानदार संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
रेशन दुकानदारांचा एका क्विंटलचे कमिशन फक्त 150 रुपये शासनाच्या वतीने दिले जाते यामध्ये दुकानाचे भाडे, लाईट बील, मजूरांची रोजंदारी मध्ये जात असल्याने अनेक वर्षांपासून कमिशनमध्ये वाढ केली नसल्याने रेशन दुकानदार अडचणीत आले आहे. कमिशनमध्ये वाढ करुन 300 रुपये प्रति क्विंटल करण्यात यावे नसता महिन्याचे मानधन 50 हजार द्यावे अशा विविध 16 मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सादर केले आहे.
यावेळी मधुकर चव्हाण, राहुल हिवराळे, सचिन करोडे, सुभाष वाकळे, श्रीमती अनिता मंत्री, रमेश वानखेडे, गंगाधर पवार, यशवंत काळे, तात्याराव मगरे, शेरखान पठाण, बाबासाहेब इंगळे, मुन्ना पाटणी, सय्यद लईकोद्दीन व शहर आणि जिल्ह्यातील शेकडो रेशन दुकानदार उपस्थित होते.
What's Your Reaction?