नमो चषकच्या माध्यमातून खेळाडूंना नवी संधी मिळाली - मंत्री अतुल सावे
नमो चषक च्या माध्यमातून खेळाडूंना नवी संधी मिळाली - मंत्री श्री अतुल सावे
67583 नागरिकांनी घेतला सहभाग घेतला
उत्साहपूर्ण वातावरणात बक्षिसांचे वितरण
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या नमो चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड तसेच राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
हा सोहळा एन-5 येथील राजीव गांधी मैदानावर मोठ्या आनंदायी वातावरणात रविवारी सायंकाळी पार पडला.
यावेळी बोलतांना राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, या खेळांच्या माध्यमातून आपल्या भारत देशातल्या खेळाडूंना वेगवेगळ्या संधी मिळाली पाहिजे. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्या पासून ऑलिंपिक मध्ये भारताला मोठ्या प्रमाणावर अनेक पदके मिळाली. पूर्वी आपल्याला एखादे पदक मिळायचे. पण मोदीजी आले त्यांनी या देशांमध्ये खेळायला महत्व दिले तसेच खेळाडूंना महत्त्व दिले. खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध करून देत चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्या. सोबतच त्यांना प्रोफेशनल खेळण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले की, या खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणाला चांगला वाव मिळत आहेत. तसेच खेळ मध्ये जय पराजय होत असतो पण आपण पराजय झाला म्हणून खचून जाऊ नका. यशस्वी होण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केल्यास यश नक्की मिळत असते अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, युवा उद्योजक अजिंक्य सावे, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय खंबायते, अनिल मकरीये, शिवाजी दांडगे, गणेश नावंदर, लक्ष्मीकांत थेठे, विवेक राठोड, नितीन खरात, बापू घडामोडे, बालाजी मुंडे, रामेश्वर भादवे, सौरभ तोतरे, राहुल बोरोले, राहुल दांडगे, अरुण पालवे, यांच्या भाजप पदाधिकारी तसेच खेळाडूंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मागील महिना भरापासून पूर्व मतदार संघात घे पंगा खेळाचा कर दंगा विजयाचा हे ब्रीद वाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या नमो चषक च्या माध्यमातून 12 पेक्षा अधिक खेळ विविध ठिकाणी घेण्यात आले होते. या सर्व खेळ प्रकारात जवळ पास 67583 नागरिकांनी सहभाग घेतला होता. यात रांगोळी आणि संगीत खुर्ची या दोन खेळ प्रकारात 23000 महिलांनी सहभाग नोंदवला होता.
या सर्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंचे पारितोषिक देऊन तसेच सहभाग घेणाऱ्या प्रत्यके खेळाडूंना केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड तसेच राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या खेळाचा होता सहभाग...
बुद्धिबळ, कब्बडी, क्रिकेट, खो खो, रांगोळी, चित्रकला, होलिबॉल, संगीत खुर्ची, मरेथॉन, वक्तृत्व, निबंध यांच्या सह इतर खेळांचा सहभाग होता.
What's Your Reaction?