नामांतर विरोधात एसडीपिआयचे बुधवारी आंदोलन
नामांतर विरोधात एसडीपिआयचे आंदोलन
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) धार्मिक ध्रुवीकरण करुन आगामी निवडणुकीत फायदा मिळावा यासाठी सरकारने औरंगाबाद नामांतराचा गैरकायदेशिर निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी शहरात सर्व मंत्री आले असताना उशिरा रात्री नोटीफिकेशन काढून औरंगाबाद विभाग जिल्हा तालुका गावाच्या नावात बदल करण्यात आले. न्यायालयात प्रकरण सुरू असताना नामांतर करण्यात आले आहे. या नामांतरावराचे नोटीफिकेशन रद्द करावे. मुस्लिम शहराचे नावे बदलण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. उस्मानाबादचेही नाव बदलण्यात आले आहे. हे नोटीफिकेशन रद्द करावे या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी, 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत नामांतर विरोधात तीव्र धरणे आंदोलन एसडीपिआयच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांनी दिली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन उपस्थित होते.
What's Your Reaction?