नाहक त्रास देण्यासाठी एकामागून एक गुन्हे दाखल, दोषारोपपत्र दाखल न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश...

 0
नाहक त्रास देण्यासाठी एकामागून एक गुन्हे दाखल, दोषारोपपत्र दाखल न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश...

नाहक त्रास देण्यासाठी एकामागून एक गुन्हे दाखल, दोषारोपपत्र दाखल न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश...

दोन गुन्ह्यात प्रतिवादींना नोटीस तसेच दोषारोपपत्र दाखल न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश...

मुंबई, दि.11(डि-24 न्यूज) - एकाच पोलिस ठाण्यात लागोपाठ दाखल झालेल्या दोन खंडणीच्या गुन्ह्यांतील संबंधित प्रतिवादींना नोटीस तसेच दोन्ही प्रकरणात दोषारोपपत्र दाखल न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश डी पाटील यांनी दिले आहे. 

याप्रकरणी हडपसर, पुणे येथील मेहबुब अब्दुल गफ्फार शेख (वय 52 वर्षे) यांनी ॲड. सईद एस शेख यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात दोन वेगवेगळे फौजदारी अर्ज दाखल केलेले आहे. 

न्यायालयात प्रकरणाच्या सुनावणीच्यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. सईद शेख यांच्यावतीने युक्तीवाद करण्यात आला की केवळ राजकीय दबावामुळे अर्जदार / याचिककर्ते यांच्यावर सन 2020 ते 2025 च्या दरम्यान विविध दिवाणी प्रकरणासंबंधी एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यापैकी दिनांक 08.10.2025 रोजी जहुर महेमूद सय्यद आणि दिनांक 12.10.2025 रोजी लॉर्डेस हॅरी स्वामी यांच्या तक्रारीवरून काळेपडळ पोलिस ठाणे, पुणे येथे एकापाठोपाठ दोन गुन्ह्यात महेबुब शेख यांना गोवण्यात आले. ज्यामध्ये खंडणी, गुन्हेगारी कट रचणे, बनावटीकरण आदींबाबत भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमे लावण्यात आली.

अशाच प्रकारे सन 2020 ते 2025 च्या दरम्यान याचिककर्त्यास इतर 5 असे एकूण 7 गुन्ह्यात गोवण्यात आले. ज्यामुळे कायद्याचा दुरुपयोग झालेला असून याचिकाकर्ता यांना नाहक त्रास होत आहे.

 ज्यावर न्यायालयाने उपलब्ध पुरावे तसेच युक्तिवादातील मुद्दे ग्राह्य धरून संबंधित गुन्ह्यातील फिर्यादीसह प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश देवून प्रकरणातील तपास सुरु ठेवून याचिककर्त्यांच्यापुरते दोषारोपपत्र दाखल न करण्याचे आदेश दिले आहे. प्रकरणात पुढील सुनावणी दिनांक 07.01.2026 रोजी ठेवली आहे. 

याप्रकरणात याचिकाकर्ते यांच्यावतीने अॅड. सईद शेख यांनी बाजु मांडली, त्यांना अडॅ. बसीत खान यांनी सहकार्य केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow