पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी लाभार्थ्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच मेळावा...!

 0
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी लाभार्थ्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच मेळावा...!

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी लाभार्थ्यांना गृहकर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बैठक संपन्न...

लवकरच पात्र लाभार्थ्यांसाठी गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)-: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घटक क्रमांक तीन अंतर्गत परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांची उभारणी सुंदरवाडी, पडेगाव, हर्सुल व तिसगाव येथे करण्यात येत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पात्र अर्जदारांची सोडत नुकतीच महानगरपालिकेत काढण्यात आली.

सदर प्रकल्पातील लाभार्थ्यांना सोडतीनंतर लागलेल्या सदनिकांच्या किंमतीतून राज्य व केंद्र शासनाचे अनुदान वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यासाठी गृहकर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आज दि. 06 मे 2026 रोजी महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे, उपआयुक्त श्रीमती अपर्णा थेते, उपअभियंता (PMAY) श्रीमती आरती नवगिरे तसेच विकासक उपस्थित होते. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया, आवास फायनान्स, पिरामल फायनान्स, वंडर फायनान्स, स्वतंत्र फायनान्स, IIFL होम फायनान्स, ICICI बँक व टायझर होम फायनान्स या बँकांच्या प्रतिनिधींनीही सहभाग नोंदवला.

बैठकीत लाभार्थ्यांना गृहकर्ज सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. तसेच महानगरपालिकेमार्फत बँक प्रतिनिधी व गृहकर्ज घेण्यास इच्छुक लाभार्थ्यांचा एकत्रित मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली गृहकर्ज मिळवण्याची सोय उपलब्ध होणार असून प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow