परभणी उर्स, वक्फ बोर्डाला 2 कोटी 67 लाख रुपयांचे मिळाले उत्पन्न

परभणी उर्स...वक्फ बोर्डाला 2 कोटी 67 लाख रुपयांचे उत्पन्न
...भाविकांच्या सोयीसुविधेवर अधिक लक्ष देणार - मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही परभणी येथील दरगाह हजरत तुराबूल येथे उर्सच्या आयोजन करण्यात येणार आहे. एक फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी 25 दरम्यान उर्स उत्सवा निमित्ताने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ तर्फे नुमाईश, शुलॅन्ड व विद्युतीकरण व इतर बाबी साठी निविदा काढण्यात आली होती. या तीनही एकत्रित कामासाठी देण्यात येणाऱ्या निविदेतून वक्फ मंडळास 2 कोटी 67 लाख 3,619 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे व सर्व धर्म समभावाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या उत्सवात परभणी व मराठवाड्यातील इतर भागातील लाखो भाविक आनंदाने सहभागी होतात.
उर्स मैदानात नुमाईश दुकान साठी गाळे तयार करणे, दुकानाची तात्पुरती विद्युतीकरण करणे, डेकोरेशन, व्हीआयपी टेंट लावणे, वेगवेगळी दुकाने भाड्याने देणे, वेगवेगळ्या प्रकारची छोटी दुकाने खेळ, होर्डिंग लावणे, मोकळ्या जागेवर हॉकर्स, पार्किंगची व्यवस्था करणे, झुल्यासाठी प्लॉट देणे, नकाशा प्रमाणे भाविकांना रस्ता करून देणे आदी कामांची जबाबदारी निविदा घेतलेल्या संस्थेची असणार आहे. या वर्षी तीन निविदा आल्या होत्या ,यात सर्वोच्च बोली लावणाऱ्या रचना इलेक्ट्रिकल्स या संस्थेस सर्व नियोजन करण्याचे काम मिळाले आहे.
वक्फ बोर्डा कडून प्रति वर्ष प्रमाणे या वर्षीही येणाऱ्या भाविकांसाठी विविध सांस्कृतिक, क्रीडा व सुफी संगीत, मुशायरा व कव्वालीची मेजवानी मिळणार आहे. भारताच्या प्रसिद्ध कव्वाल तसेच मुशायऱ्याला नामवंत शायर गजलकार उपस्थित राहून श्रोत्यांना अभिभूत करतात. म्हणूनच तुराबूल हक उर्सचे आगळेवेगळे महत्व आहे.
भाविकांच्या सुविधेसाठी कोणतीही काटकसर ठेवणार नाही- मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद जुनेद
परभणीत हजरत तुराबूल हक साहेबांचा उर्स हा गेल्या शंभर वर्ष पासून सुरू आहेत. महाराष्ट्रात अजरामजार असलेल्या उर्सच्या निमित्ताने देशभरातील लहान मोठे व्यापारी येतात. हजरत तुराबूल हक यांचे दर्शन घेणाऱ्या व आनंदोत्सवात सामील महिला, बाल व वृद्धांच्या सुविधेत कोणतीच काटकसर राहू नये या साठी मंडळा कडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची एक टीम नेमण्यात येणार आहे. चोवीस तास सिसिटीव्ही कॅमेऱ्यातून हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे. शेवटी हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या आनंदोत्सव यशस्वी व्हावा हा आमचा उद्देश राहणार आहे.
What's Your Reaction?






