परवीन नबी पटेल जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात...!
परवीन नबी पटेल जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- वैजापूर तालुक्यातील तीडी गावातील सोसायटीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते नबी पटेल यांच्या सुविज्ञ पत्नी श्रीमती परवीन पटेल यांनी आज औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महीला आरक्षित जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज गावकऱ्यांच्या साक्षीने सादर केला आहे. याप्रसंगी डॉ. दिनेश परदेशी व सोसायटीचे सभासद उपस्थित होते. 21 संचालक असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत दोन जागा महीला प्रतिनिधी साठी राखीव असल्याने गांवक-यांच्या आग्रहाखातर उच्च शिक्षित परवीन पटेल शेतकऱ्यांचा हितासाठी या निवडणुकीत आपले भाग्य पहिल्यांदाच आजमावत आहे. याप्रसंगी वैजापूर तालुक्यातील सभासद मतदारांना नबी पटेल, छावा संघटनेचे रवी बोडखे, मंगेश वडगावकर, इस्माईल पटेल व प्रतिष्ठित नागरिकांनी परवीन पटेल यांना मोठ्या मताधिक्याने विजय करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची संधी द्यावी असे कळकळीचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?