जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार विलास बापू भुमरे बिनविरोध...

 0
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार विलास बापू भुमरे बिनविरोध...

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत आमदार विलास बापू भुमरे यांची बिनविरोध निवड...

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, निवडणूक 2026 मध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पैठण यामधून संचालक 

पदी निवड... 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, निवडणुकीत पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारी अर्जाच्या विरोधात कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे.

आमदार विलास बापू भुमरे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यानिमित्ताने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला तसेच आ. भुमरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विलास बापू भुमरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्र अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow