पाणी प्रश्नावर इस्लाम पार्टी अक्रामक, उद्या महापालिकेवर हंडा मोर्चा...!
पाणी प्रश्नावर इस्लाम पार्टी अक्रामक, उद्या महापालिकेवर हंडा मोर्चा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) - मालेगाव येथून शहरात इस्लाम पार्टीने (Indian Secular Largest Assembly Of Maharashtra) जोरदार इंट्री केली. पक्षाचे सर्वेसर्वा आसिफ शेख यांनी शहरात जनतेचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी कोअर कमिटीची स्थापना केली. कोअर कमेटीतील नेते शहरात पक्षाचे काम बघत आहे. शहरात तापत्या उन्हात पाणी प्रश्नावर सामोरे जावे लागत आहे. आठ ते दहा दिवसाआड नळाला पाणी येत आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी शहरात पोहोचले नाही. नव्या वसाहती जारच्या पाण्याने तहान भागवत आहे. उद्या सोमवारी सायंकाळी चार वाजता महापालिकेच्या मुख्यालयासमोर इस्लाम पार्टीच्या वतीने भव्य हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन हंडा मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन इस्लाम पार्टीचे नेते रफत यारखान यांनी केले आहे. यावेळी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
What's Your Reaction?