पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ किसान काँग्रेस रस्त्यावर, जिल्हाधिका-यांना दिले निवेदन...!
पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ किसान काँग्रेस रस्त्यावर, जिल्हाधिका-यांना दिले निवेदन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(प्रतिनिधी)- डिपीसी बैठकीत शासनाने मका व कापूस खरेदी सुरू करावी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रोखल्याने किसान काँग्रेस अक्रामक झाली आहे. आज दुपारी किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्र्यांच्या वृत्तीचा निषेध करण्यासाठी घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश सचिव अनिस पटेल, किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव अशोक डोळस, जिल्हाध्यक्ष अशोक डोळस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे शासनाने शेतकऱ्यांसाठी मक्का खरेदीला हमीभाव दिलेला आहे. प्रती क्विंटल 2500 रुपये प्रमाणे हमीभावाने मक्का खरेदी करावी. परंतु असे न होता व्यापारी 1250 प्रती क्विंटल खरेदी दराप्रमाणे खरेदी करत असून यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे. कापसालाही हमीभाव देण्यात यावा. कांदा, कापूस, सोयाबीनचे पडलेले भावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. मक्का खरेदी केंद्राचा प्रश्न यामध्ये शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कोंडी सरकारने थांबवावी. शेतकऱ्यांचा माल हमी भावाने खरेदी करावे नसता किसान काँग्रेस तीव्र आंदोलन राज्यात करणार असा इशारा निवेदनात दिला आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव अनिस पटेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव अशोक डोळस, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रमंडवाल, अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, एड इक्बालसिंग गिल, अकिप रजवी, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष शेजवळ, एनएसयुआय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे, असमत खान, महिला काँग्रेसच्या नेत्या अनिताताई भंडारी, महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष हेमाताई पाटील, अरुणा लांडगे, जखिया बाजी, जोसेफ मॅडम, शीला मगरे, सुभाष देवकर, नदीम सौदागर, साजिद कुरेशी, महेश वैद्य, सलीम पटेल, शाहिद खान, अजमल खान, सय्यद युनूस व शेतकरी उपस्थित होते.
What's Your Reaction?