पैठण रोडवरील 477 अतिक्रमण निष्कासित, उद्याही कार्यवाई

 0
पैठण रोडवरील 477 अतिक्रमण निष्कासित, उद्याही कार्यवाई

महानुभाव चौक ते नक्षञवाडी दरम्यान एकूण 477 अतिक्रमणे निष्कासित

 उद्या देखील याच रोडवर कारवाई - वाहूळे 

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत महानुभाव चौक ते नक्षञवाडी दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण 477 एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल, लॅाज, दुकाने, शेड, कंपाऊंड, ओटे, गॅरेज,वॅाशिंग सेंटर, कमान, जाहिरात फलक,इ. चा समावेश आहे, निष्कासित करण्यात आले आहेत.

सदर कारवाई मध्ये महानगरपालिकेच्या 350 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे 400 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

या कारवाईसाठी 10 जेसीबी, 4 पोकलॅन, 15 टिप्पर, 2 रूग्णवाहिका, 2 कोंडवाडा वाहने, 2 अग्निशमन बंब, 4 इलेक्ट्रिक हायड्रॅालीक वाहने इ. वाहनांचा समावेश होता.

सदरील कारवाई मध्ये नगररचना विभागाचे उप संचालक मनोज गर्जे, कार्यकारी अभियंता (यांञिकी) अमोल कुलकर्णी, सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, अशोक गिरी, समीउल्लाह, भारत बिरारे, राहूल जाधव, नईम अन्सारी 

इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, सय्यद जमशेद, मजहर अली, नगररचना विभागाचे सौरभ साळवे, सूरज संवडकर, राहूल व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव हे कर्मचारी उपस्थित होते.

 उद्या देखील कारवाई...

आजची कारवाई महानुभाव चौक ते नक्षञवाडी पर्यंत करण्यात आली असून उद्या अशीच कारवाई नक्षत्रवाडी ते महानुभाव चौक पर्यंत केली जाईल, अशी माहिती संतोष वाहूळे यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow