प्रभाग क्रमांक 22, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या उमेदवार सौ.प्रणिता भंडारी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन...
प्रभाग क्रमांक 22, राष्ट्रवादीच्या प्रणिता भंडारी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- महापालिका निवडणुकीसाठी शहरात प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 22 विजयनगर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ.प्रणिता सागर भंडारी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील व महिला जिल्हाध्यक्षा छायाताई जंगले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रभागातील मतदारांना पांडुरंग तांगडे पाटील यांनी सौ.प्रणिता भंडारी यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
निवडून दिल्यास प्रभागातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार, प्रत्येक घरात नळ व मुबलक पाणी, स्वच्छ रस्ते, स्ट्रीट लाईट व्यवस्था, महापालिका सर्व शाळांमध्ये सुविधा व इंग्रजी शाळा सुरू करणार, प्रभागात सामाजिक सभागृह उभारण्याचा संकल्प केला.
यावेळी जिल्हा सचिव प्राचार्य सलिम शेख, सचिव जावेद मदार, आकाश गायकवाड, सागर भंडारी, शेख मुबारक, रेहान पटेल व प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?