फाजिलपुरा येथे रिक्षा स्टँडचे उद्घाटन, गरज 2 हजार रिक्षा स्टँडची उरले फक्त 150
 
                                फाजिलपुरा येथे रिक्षा स्टँडचे उद्घाटन
शहरात दोन हजार रिक्षा स्टँडची गरज असताना फक्त 150 उपलब्ध आहे...नो पार्किंगमध्ये रिक्षा उभी केल्यास ऑनलाईन चालान मिळत असल्याचा रिक्षा युनियनचा आरोप....
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) 5 रिक्षा उभी राहतील या क्षमतेचे फाजिलपुरा, एसटी काॅलनी येथे आज दुपारी रिक्षास्टँडचे उद्घाटन करण्यात आले. अधिकारी व्यस्त असल्याने रिक्षाचालक मालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहेमद खान यांनी रिक्षा स्टँड फलकाचे उद्घाटन केले.
त्यांनी यावेळी सांगितले शहरात 13 हजार पेट्रोल व एलपिजी रिक्षांची संख्या आहे तर दोन हजार ई-रिक्षांची भर पडली आहे. आरटिएने शहरात दोन हजार रिक्षास्टँडला मंजूरी दिलेली आहे. प्रशासनाने त्याची आतापर्यंत अंमलबजावणी केली नसल्याने रस्त्यावर रिक्षा उभी केली तर ई-चालान रिक्षाचालकांना मिळत आहे. शहरातील रस्ते चकचकीत करण्यात येत आहे परंतु रिक्षाचालकांना रिक्षा स्टँडसाठी मनपाच्या वतीने जागा दिली जात नाही. अगोदर शहरात 600 रिक्षा स्टँड होते त्यामधून फक्त 150 रिक्षास्टँड एक्टिव्ह आहेत उरलेले गायब झाले आहे. म्हणून मनपा आयुक्त व पोलिस आयुक्त यांना रिक्षा युनियनने विनंती केली आहे मंजूर असलेल्या रिक्षा स्टँड साठी जागा उपलब्ध करुन द्यावी.
याप्रसंगी रोशन ऑटो युनियनचे नाहिद फारुकी, रिक्षा स्टँडचे अध्यक्ष सय्यद उस्मान, उपाध्यक्ष सय्यद इस्माईल, सदस्य अफजल खान, परशुराम पाटील, दिपक जाधव, राशिद देशमुख, एजाज खान, अली हसन यांची प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            