बार्टीच्या तर्फे पोस्ट डॉक्टरल फेलोशिप सुरू करण्याची मागणी
बार्टीच्या तर्फे पोस्ट डॉक्टरल फेलोशिप सुरू करा काँग्रेसची मागणी...
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) काँग्रेसच्या वतीने बार्टीच्या तर्फे पोस्ट डॉक्टरल फेलोशिप सुरू करा या मागणीचे निवेदन शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना शिष्टमंडळाने आज दिले.
UGC, ICSSR च्या धर्तीवर पोस्ट डॉक्टरल फेलोशिप सुरू करून संशोधन कार्यास अधिक चालना मिळेल असा सूर संशोधकानाचा असल्याचे आढळून आले आहे, विविध विषयात Ph.D झाल्यानंतर सुदधा सखोल संशोधन करण्याकरिता आर्थिक पाठबळ जर संशोधकांना मिळाले तर संशोधन अधिक उत्तम व दर्जेदार होण्यास मदत होणार आहे असेही संशोधक व उच्च शिक्षण क्षेत्रातील
तज्ञांचे म्हणणे आहे, तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कॅग्या मार्फत शासन दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ वतीने करण्यात आली. यावेळी डॉ.अरुण शिरसाट (शहराध्यक्ष, SC सेल), अनिस पटेल (महासचिव), ऍड.इक्बालसिंग गिल, प्रा.शिलवंत गोपणारायन, संतोष भिंगारे, उमाकांत खोतकर, विनायक सरवदे, महावीर पहाडे, रेखा राऊत, अनिता भंडारी, सुहासिनी घोरपडे, कैसर बाबा, रवी लोखंडे, मंजुताई लोखंडे आदी संशोधक, काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?