मतीनच्या बुलडोझर कारवाईचा फटका भाजपचे नगरसेवकांना, स्वतः अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात...!
कार्यवाईची भीती, अतिक्रमण कारवाईवरुन राजकारण तापले, भाजपाचे नगरसेवकांनी स्वतः बांधकाम हटविणे सुरू...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) - नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर कारवाईनंतर शहराचे राजकारण अवैध बांधकामामुळे चांगलेच तापले आहे. नारेगाव येथील घरात नीदा खानला आश्रय ज्या घरात देण्यात आला होता तो घर आणि नगरसेवक मतीन पटेल यांचे राहते घरावर महापालिकेने हातोडा चालवला. सत्ताधारी पक्षाने आप पाट थोपटून घेतली. एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी त्याच दिवशी दुपारी मनपा आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन सत्ताधारी भाजपचे दोन नगरसेवक गणेश नावंदर व विश्वनाथ स्वामी यांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर कधी चालवणार असा सवाल केला होता. पुरावेही आयुक्तांना सादर केले होते. याचा परिणाम असा झाला शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना आपले अवैध बांधकाम स्वतः काढून घेण्याची वेळ आली आहे. ऑपरेशन मतीन पटेल यांचा फटका भाजपचे नगरसेवक नावंदर व स्वामी यांना बसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महापालिकेत आमचीच सत्ता आहे आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही अशा आविर्भावात हे नगरसेवक होते. परंतु 115 पैकी कीती नगरसेवकांचे घर परवानगी घेऊन बनले आहे का हे तपासण्याची गरज आहे महापालिका असे आदेश काढणार का...? असा सवालही शहरातील नागरिक विचारत आहेत.
महापालिकेने ऑपरेशन मतीन पटेल राबवून एमआयएम नगरसेवकाच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारला त्यानंतर भाजपचे दोन नगरसेवकांच्या अतिक्रमणाचे पुरावे देत सांगा कधी पाडणार हे अतिक्रमण असा केला. अतिक्रमण काढता की पाडू अशी फजियत नावंदर व स्वामी यांची झाल्याने त्यांनी रविवारी स्वतः अनधिकृत बांधकाम काढण्याचे सुरुवात केली. मतीनचा फटका या दोन्ही नगरसेवकांना बसला आहे. महापालिकेत आमचीच सत्ता आहे काही होत नाही अशा आविर्भावात असणाऱ्या नगरसेवकांना हा चांगलाच धडा असल्याची चर्चा आहे. रविवारी सकाळी चिश्तिया काॅलनी चौकातील इमारतीवरील पहिल्या मजल्याचे बांधकाम ब्रेकरने काढण्यास स्वामी यांनी सुरू केले. नावंदर यांनीही अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.
निवडणुकीनंतर बांधकामाबाबत तक्रार करण्यात आली होती. माझ्याकडे G+2 बांधकामाची परवानगी आहे. संपूर्ण बांधकाम अनधिकृत नाही. नाल्यावर बांधकाम केलेले नाही घराजवळ नाली असून त्या बाजूने 3 फूट बाय 1.5 फूटाची गॅलरी काढली होती. समोरील गॅलरीत भिंत बांधली होती. तक्रारीनंतर पक्षश्रेष्ठींनी मला अतिक्रमित बांधकाम काढून घेण्यास सांगितले आज ते मी काढून घेत आहे. असे नगरसेवक गणेश नावंदर यांनी सांगितले.
अतिक्रमण विभाग किंवा झोन कार्यालयाकडून मला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. माझे बांधकाम अधिकृत आहे. पहिल्या मजल्यासाठी मी सन 2018 मध्ये सिडकोची NOC घेतलेली आहे. बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्रही घेतलेले आहे. सन 2026 मध्ये सिडकोची NOC रिन्यूव्ह केली आहे. त्यामुळे अतिक्रमण काढण्याचा प्रश्नच नाही. नूतनीकरणाच्या कामासाठीच मी काढत आहे अशी प्रतिक्रिया नगरसेवक विश्वनाथ स्वामी यांनी दिली आहे.
What's Your Reaction?