मनपाच्या सीबीएसई इंग्रजी शाळेत मराठी दिन उत्साहात साजरा...!

मनपा सीबीएसई प्रियदर्शनी मध्ये मराठी दिन साजरा...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)
मराठी भाषेचा विकास आणि प्रसारास चालना मिळावी या दृष्टिकोनातून मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनात व शिक्षिका तेजस्विनी देसले यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांची सुरुवात ग्रंथदिंडीने व संतांच्या फेरीने सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम मराठमोळ्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मराठी शब्दकोशांचे पूजन केले. भाषासमृद्धीची प्रातिज्ञा घेण्यात आली. रश्मी होनमुटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.. तसेच स्वाती डिडोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे भाषिक खेळ घेतलेत. यात इंग्रजी शब्दाला मराठी शब्द, एकच अक्षर असलेले शब्द असा मजेशीर गेम घेतला. तसेच विद्यार्थ्यांनी भारूड, पोवाडा, बडबड गीत, अंगाई गीत, विनोद, हास्य गीत, अभंग, ओवी,चारोळ्या, हयाकू काव्य प्रकार, विनोदी नाटिका सादर केले. तसेच कुसुमाग्रजबद्दल कृष्णा यादव या विद्यार्थ्याने माहिती सांगितली.
अभिजात मराठी दर्जा मिळाल्यानंतर पहिला मराठी दिन साजरा करताना अभिजात मराठी याचा अर्थ मिळाल्याचा दिनांक आणि कोणते पुरावे वापरले गेले आणि याचा फायदा याबद्दल सविस्तर माहिती तेजस्विनी देसले यांनी सांगितली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बी आर राठोड, स्मिता मुळे, वंदना पवार, प्रशांत निकाळजे यांनी सहकार्य केले.
What's Your Reaction?






