मनपा आयुक्तांनी दिला अपघातग्रस्त विद्यार्थ्यीनीला मदतीचा हात...!

मनपा आयुक्तांनी दिला अपघातग्रस्त विद्यार्थिनीला मदतीचा हात...
अपघातग्रस्त विद्यार्थिनीवर तत्काळ उपचार...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)
महाविद्यालयीन दोन अपघातग्रस्त तरुणींना आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आज मदतीचा हात देऊन प्रशासन सोबत एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी आपले कर्तव्य बजावले.
आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुभेदारी गेस्ट हाऊस समोर दोन महाविद्यालयीन तरुणींना एका दुचाकी स्वाराने जोरात धडक देऊन जखमी केले. सदर तरुणी शासकीय महाविद्यालयात जाण्यासाठी रिक्षातून उतरत होत्या. त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालय कडे वेगात जाणाऱ्या दुचाकी स्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. यामुळे वाहतूक खोळंबली होती. या दरम्यान आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत हे आपल्या निवास स्थांनाहून निघून स्मार्ट सिटी कार्यालय येथे बैठकीसाठी जात होते. त्यांचे शासकीय अंगरक्षक कल्याण गाडेकर हे नेमके वाहतूक का खोळंबली आहे हे पाहण्यासाठी खाली उतरले. याच दरम्यान माहिती व जनसंपर्क विभागाचे कनिष्ठ लिपिक अतुल बनकर हे विभागीय आयुक्त कार्यालय येथून मनपा मुख्यालय येथे येत होते. ते ही या वाहतुकीत अडकले. आयुक्तांचे वाहन पाहून ते ही वाहनाकडे गेले.
रस्त्यावर दोन अपघातग्रस्त महाविद्यालयीन तरुणींना त्यांनी पाहिले व याची माहिती आयुक्त महोदयांना दिली. या नंतर आयुक्त यांनी तत्काळ दोन्ही अपघातग्रस्त विद्यार्थिनीवर उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी अंगरक्षक कल्याण गाडेकर व अतुल बनकर यांना आदेशित केले.
यानुसार सबंधित दोन्ही कर्मचारी यांनी स्वतःदोन्ही तरुणींना रिक्षात बसवून त्यांना शासकीय रुग्णालय येथे घेऊन गेले. यातील एक तरुणी ही बीड पाचोड या ठिकाणची होती. सदर दोन्ही तरुणींवर शासकीय रुग्णालय येथे आवश्यक ते प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर दोन्ही अपघातग्रस्त तरुणींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सबंधित कर्मचारी यांनी बेजबाबदारपनें दुचाकी चालवून अपघात करणाऱ्या दुचाकी चालका विरूद्ध सबंधित पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले.
सबंधित विद्यार्थिनी साक्षी मदगे आणि श्वेता दाभाडे यांनी मनपा आयुक्त व दोन्ही कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले.
What's Your Reaction?






