मनपा प्रशासकांनी दिले विद्यार्थ्यांना गोल्फचे धडे...

प्रशासकांनी दिले विद्यार्थ्यांना गोल्फचे धडे...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 14(डि-24 न्यूज) - महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या यांच्या संकल्पनेतून "मी आयुक्त होणार" या नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत आज मनपा प्राथमिक शाळा कांचनवाडी या शाळेतील विद्यार्थ्यानी आयुक्त यांचे निवासस्थानी जलश्रीला भेट दिली.
या शाळेतील विद्यार्थ्यांना मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी गोल्फ खेळ कसा खेळला जातो याची विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि प्रत्यक्षात गोल्फ स्टिक कशी पकडली पाहिजे, गोल्फ कसा मारला पाहिजे हे दाखविले.
त्या नंतर सुरू झाला मग विद्यार्थ्या सोबत प्रेरणादायी संवाद आणि जसा जसा संवाद वाढू लागला तसे तसे विद्यार्थी आपल्या मध्ये लपलेले सुप्त गुण दाखवू लागले. किरण नावाच्या विद्यार्थ्याने चांगल्या चांगल्या शाहिरला लाजवेल असा शाहिरी पोवाडा साहेबांच्या समोर हातवारे करून सादर केला व त्या नंतर मग मुली कुठल्या कमी दिव्या नावाची विद्यार्थिनी समोर आली आणि म्हणाली मी डान्स करते. डान्स चे शब्दात वर्णन करता येणार नाही असा त्या विद्यार्थिनींनी सुंदर असा डान्स केला . एका विद्यार्थ्याने सुंदर ड्रॉइंग काढलेले चित्र सराना भेट दिले.
आदरणीय सरानी दिव्या आणि किरण या दोन्ही विद्यार्थ्यांना शेजारी बसवले दोघांच्या खांद्यावर मित्रासारखे हात ठेवले आणि तुम्हाला आणि तुमच्या शाळेला काय पाहिजे म्हणून विचारले असता त्यांनी आम्हाला वर्गखोल्या पाहिजेत मग सरानी वर्गखोल्या बांधकामसाठी जागा तेथे नसल्यामुळे लगेचच नवीन जागेचा शोध घेण्यासाठी सांगितले आणि तेथे इमारत व गोल्फ चे ग्राउंड तयार करण्यात येईल म्हणाले. या शाळेला गोल्फ ची शाळा म्हणून घोषित केले त्या नंतर सर्व विद्यार्थ्यांनी खो खो ,कबड्डी,लंगडी,रस्सीखेच,क्रिकेट असे विविध नाना प्रकारचे खेळ खेळले त्या नंतर निसर्ग ट्रिप सारखे मस्त पैकी जेवण खाली हिरवळीवर बसून केले आणि आदरणीय सरांच्या स्वाक्षरीच्या व शुभेच्छा संदेश लिहिलेल्या वह्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
विद्यार्थी खूप खूप खुश होऊन गेले .
या वेळी अंकुश पांढरे उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख, गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी, भारत तीनगोटे शिक्षणाधिकारी , रामनाथ थोरे शिक्षण विस्तार अधिकारी, ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी आणि गजानन शिरसाट मुख्याध्यापक ,अमोल शेरखाने, स्मिता गंगावणे, सुनंदा राठोड, कांता सोनवणे या शिक्षका सह गणेश शिरसाट क्रीडा निदेशक उमस्थित होते.
What's Your Reaction?






