मनोरुग्ण महिलेला पोलिसांनी केले माणुसकी वृध्द सेवालयात दाखल...
जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या मनोरुग्ण महिलेला पोलीसांनी केले माणुसकी वृध्द सेवालयात पुनर्वसनासाठी दाखल...
पोलीस घेत आहेत नातेवाईकांचा शोध महिला हि विमनस्क अवस्थेत मिळुन आली होती...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि.-9/12/2025 रोजी संध्याकाळी 7.30 वा.सुमारास पंचवटी हॉटेल त्रिमुर्ती चौक जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विमनस्क अवस्थेत एक महिला मिळुन आलेली होती. महिला पोलीसांनी तीला कपडे घालायला दिले. पोलीस ठाणे जवाहरनगर येथे आणुन महिला पोलीस अंमलदारा मार्फत तिच्या राहत्या ठिकाणा बावत चौकशी केली असता तीने तीचे नाव नंदिनी आशोक चक्रवती गाव मॅजेस्टिक मेट्रो काम्पेवाडा बस स्टॅन्ड बंगलोर हे सांगितले. सदर महिला ही भोळसर स्वभावाची असुन उडवा-उडवीचे उत्तरे देत होती. तसेच तिने तिच्या नातेवाईकांबाबत कुठलीही माहिती पोलिसांना दिली नाही.
पो.नि.सो.सचिन कुंभार यांनी बेवारस मनोरुग्णासाठी काम करणाऱ्या सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेशी संपर्क साधला व सदर महिलेची माहिती दिली कि यात आपन काही मदत करु शकता का...? माणुसकी वृद्ध सेवालयाचे सुमित पंडित व पुजा पंडित यांनी त्या महिलेच्या पुनर्वसनासाठीची जबाबदारी स्विकारली व पोलीसांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात प्रथमोपचाकरिता दाखल केले असता तीस मानसिक आजार असल्याने डॉक्टरांनी सांगितले तरी तीला तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरत्या निवाऱ्यासाठी माणुसकी वृध्द सेवालय गावंदरी तांडा येथे पुनर्वसनासाठी रात्री उशिरापर्यंत दाखल केले. या महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी झोन -२,
पोलिस निरीक्षक सचिन कुंभार, जवाहर नगर, अतीश लोहकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, मारुती खील्लारे पो.उप निरिक्षक, विनोद बनकर पो.हे.काॅ,ज्ञानेश्वर शेलार, महिला पो.हे.काॅ रत्नमाला धुळे, सुनीता ठोंबरे, माणुसकी समुहाचे सुमित पंडित, मनोज वखरे, संचालिका माणुसकी वृध्द सेवालय पुजा पंडित आदिंनी मदतकार्य केले.
एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मनोरुग्ण महिलेला पुनर्वसनासाठी मदत केली...
सदर महिलेला नातेवाईक शोध घेत असल्याने जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या महिला नामे नंदिनीला एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मदत केली. ती मानसिक आजाराने पिडित आहे. हा त्यांचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरीक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा ? प्रश्न ह्या एका महिलेचाच नाही, तर अजून कितीतरी असतील. ज्या अशाच अबोध आपल्या देहाला बेशुद्ध मिरवत असतील समाजातील वाईट नजरे सामोर. मग यांच्यासाठी एक मायेचे आपुलकीचे घर आहे का ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? जीवनात संकट सांगून येत नसतात. आपण आपल्या मर्यादा जर खरच वाढवल्या आणि मदतीचा हात सामाजिक संस्थाना लावला, जे अशा स्वरूपाचे काम करण्यास उभे होत आहेत. तेव्हा खऱ्या अर्थाने मनोरुग्णाचा मानसिकतेत स्थिरता येईल. समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल.
----श्री सचिन कुंभार,वरिष्ठ पोलिस निरीक्षक जवाहरनगर
What's Your Reaction?